प्रतिनिधी( नळदुर्ग )

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात नळदुर्ग पोलिसांना यश
या टोळीतील 1 जणांना अटक करण्यात आली आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सय्यद सिराजोद्दीन सय्यद फयाजोद्दीन, वय 36 वर्षे, रा. मुलगा मठ जोशीगल्ली हुमणाबाद जि. बिदर राज्य कर्नाटक हे त्यांची ट्रक क्र के. ए. 56 -0237 मध्ये पानमसाला भरुन घेवून गुजरात येथे जात होते. दरम्यान आरोपी नामे-1) मिट्टू रणजितसिंग ठाकुर 2) रोहित राठोड दोघे रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव व त्यांच्या सोबत अनोळखी चार इसम यांनी नळदुर्ग ते तुळजापूर जाणारे रोडवर गोलाई चौकाचे पुढे आल्यावर फिर्यादी यांचे ट्रकच्या पुढे पांढऱ्या रंगाची स्कारर्पीओ गाडी आडवी लावून सय्यद सिराजोद्दीन यांचे अंगावर मिर्ची पुड टाकली. व गळ्याळा कोयता लावुन लाथाबुक्यानी, फायबरच्या काठीने मारहाण केली. सय्यद सिराजोद्दीन यांचा चुलत भाउ सय्यद फैराद सय्यद करीम यांना डोक्यात मारहाण करुन सय्यद सिराजोद्दीन व त्यांच्या चुलत भाउ फैराद सय्यद यांना स्कार्पीओ गाडीमध्ये जबरदस्तीने टाकुन घेवून जावून स्वताचे आर्थीक फायद्यासाठी दहशत निर्माण करुन फिर्यादीच्या ताब्यातील ट्रक क्र के. ए. 56 -0237 व ट्रक सह सुपर पान मसाला चे 50 मोठे पोते, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम 5,000 पिवळ्या रंगाची ताडपत्री असा एकुण 30,30,200₹ किंमतीचा माल हा जिवे मारण्याची धमकी देवून बळजबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या सय्यद सिराजोद्दीन यांनी दि.30.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 395,386,364(ए),341, 342 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील ,उमरगा संभाजीनगर ,सोलापूर सह इतर ठिकाणी घडलेल्या अशा अनेक घटनांमध्ये मुख्य सूत्रधाराची भूमिका बजावलेल्या आरोपीचे लवकरच नळदुर्ग पोलीस मुस्क्या
आवळणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या .टोळीकडून आणखी काही मोठ्या गुन्ह्याची उकल ही होणार असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *