आश्लेष भैय्या मोरेंनी स्वीकारले मुलीच्या पदवीपर्यंत मोफत शिक्षणाची जबाबदारी
(धाराशिव प्रतिनिधी )
उमरगा तालुक्यातील तलमोड गावातील एका मुस्लिम कुटुंबातील मुलीचा बालविवाह 21 डिसेम्बर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला गुप्तबातमीदारामार्फत समजली त्यावरून सदरची माहितीची शहानिशा करून जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार व तहसीलदार गोविंद येरमे यांच्या मार्गदर्शनाणे सदरचा बालविवाह नियोजित वेळेआधीच परिवाराचे समुपदेशन करून रोखन्यात दि 23 नोव्हेंबर रोजी प्रशासनाला यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि 20 नोव्हेंबर रोजी गुप्तबातमीदारामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात तलमोड येथील एका मुस्लिम कुटुंबातील मुलीचा दि 21 डिसेम्बर रोजी बालविवाह संपन्न होणार अशी माहिती प्राप्त झाली त्यावर जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी सदरच्या प्राप्त माहितीची शहानिशा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सचिन बिद्री यांना कळविले त्यांनंतर उमरगा तहसीलदार गोविंद येरमे यांच्या मार्गदर्शनाने आणि भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा तलमोड गावचे प्रतिष्टीत नागरिक आश्लेष भैय्या मोरे यांच्या पुढाकाराणे बालविवाह रोखण्याचे कार्य झाले. दरम्यान, आश्लेष भैय्या मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर,तलमोड गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक आदींनी संबंधित परिवाराचे समुपदेशन करीत बालविवाह कायद्याची व बालविवाहाच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली.

मुलीच्या कौटुंबिक परिस्थिती पाहता आणि तिची शिक्षण घेण्याची इच्छा पाहता आश्लेष भैय्या मोरे मित्र मंडळाने शैक्षणिक दिलासा देत संबंधित मुलीच्या पदवीपर्यंत शिक्षणाची मोफत व्यवस्था भारत शिक्षण संस्था संचालित छ. शिवाजी महाविद्यालयामार्फत केली जाईल असे श्री काणेकर यांनी सांगितले.
यावेळी संबंधित परिवाराचे समुपदेशन करून 18 वर्षपूर्ती झाल्याशिवाय विवाह केले जाणार नाही असे लेखी हमीपत्र मुलीच्या पालकांकडून पंचासमक्ष घेण्यात आले. या पंचनामा अहवालावर अल्पवईन मुलीच्या पालकांसह ग्रामसेवक जे एम गायकवाड,सरपंच सौ.उषा मोरे, उपसरपंच गणेश मोरे,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पिस्के,राजेंद्र जाधव,मल्लिनाथ स्वामी,गोरख साळुंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.