पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची जबरदस्त कामगिरी
प्रतिनिधी (नळदुर्ग )
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठीचा कच्चा रसायनाचा साठा तसेच साधनसामग्रीसह गावठी हातभट्टीची दारूची निर्मिती करताना पोलिसांनी कारवाईत दारूसह सर्व साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.
दि .१ / १२ /२०२३ रोजी येडोळा तांडा व लोहगाव येथे सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर नळदुर्ग पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या आदेशाने
गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.
नव्याने रुजू झालेले
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे .यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाईची मोहीम जोरदार सुरू केली आहे..नळदुर्ग परिसरात सुरू असलेले गावठी अड्डा सुरू असल्याची
गुप्त माहितीच्या आधारावर अचानक धाडसत्र सुरू केल्याने हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहेत. नळदुर्ग पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून सुमारे ४,३१,०० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी उद्ध्वस्त केला
असून चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
आरोपी नावे १ )लक्ष्मण प्रकाश आडे, रा. येडोळा
२) राजू धोंडीबा राठोड रा. येडोळा ३)संजय सिद्धू राठोड रा. येडोळा ४) जालीदर रेवण रा येडोळा या चौघा विरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळेस उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे. निरीक्षक तायवडे. सुरज देवकर .उपनिरीक्षक संजय झराड. निरीक्षक कवडे. निरीक्षक मुंडे. उपनिरीक्षक पवन मुळे. नळदुर्ग पोलीस स्टेशनचे स्टॉप कर्मचारी राज्य उत्पादन शुल्क चे स्टॉप कर्मचारी उपस्थित होते.