धनगर समाजास एस,टी मध्ये सामाविष्ट करून घेण्यासाठी मंगळवार दि ५ डिसेंबर रोजी आष्टा येथिल धनगर समाजाच्या वतिने आष्टा येथिल बिरोबा मंदिरा पासून ते अप्पर तहसिलदार यांना निवेदन देऊन हिंदु ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात येऊन चक्काजाम आंदोलन होणार आहे .
सरकारच्या धनगड या शब्दाचा अपभ्रंश झाल्याने धनगर समाज आज पर्यंत एस टी प्रर्वगात सामाविष्ट होऊ शकला नाही . तर धनगड हि जात देशात कोठेही आढळून येत नसून मागासवर्गीय प्रर्वगातून साडेतिन टक्के आरक्षण देण्यात यावे अशी प्रमुख मागणी आहे . या मागणीसाठी नुकतीच आष्टा येथे बिरोबा मंदिरात बैठक झाली असून परिपत्रक हि वाटण्यात आले आहे.
मंगळवारी होणार्य या मोर्चास आष्टा येथिल सर्व धनगर समाज बांधवांनी एकत्रीत येण्याचे आवाहन या परिपत्रकाद्वरे करण्यात आले आहे
