(धाराशिव प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांना पुण्यस्मरणोत्सवानिमित्त श्री राजगुरू शिवलिंगेश्वर हिरेमठ नळदुर्ग यांच्या वतिने दि 5 रोजी आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

जिल्ह्यात पत्रकार आयुब शेख हे गेल्या अनेक वर्षापासून Ntv न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता करत असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत श्री राजगुरू शिवलिंगेश्वर हिरेमठ नळदुर्ग चे मठाधिपती श्री. ष .ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांनी प्रशस्तीपत्र पत्र देऊन सन्मानित केले. नळदुर्ग येथे राजगुरु श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्य स्मरणोत्सव धर्मसभा व सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, महंत,भाविकभक्त आणि प्रतिष्टीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार अयुब यांना सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल परिसरातील नागरिक व मित्र परिवारातून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.