छत्रपती संभाजीनगर

सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील हास्य कलाकार सिद्धार्थ सोनवणे यांची घरची परिस्थिती हलाख्याची असुन ते एक गरीब कुटुंबातील कलाकार आहे आपल्या कलाच्या जोरावरती सोनवणे यांनी आपले नाव लौकिक केलेले असुन सिद्धार्थ सोनवणे यांची जुनियर भाऊ कदम म्हनुण ओळख आहे त्यांना जुनियर भाऊ कदम याच नावाने ओळखतात त्यांची खास शैली १५० आवाजांचा बादशहा म्हनुण ही ओळख निर्माण झालेली आहे सिध्दार्थ सोनवणे हे राजकीय नेते, क्रिकेटर, गायक ,आणि सिनेमा अभिनेता नट कलाकारांचे असे १५० आवाज काढुन कार्यक्रमामधे धमाल करतात त्यामुळे या कलाकाराला चाहत्यांकडुन खुप मोठा मान सन्मान प्रतीसाद मिळत आहे सन २०२२ — २३ चा ज्ञानरत्न कला गौरव पुरस्कार हा. आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे मुख्यसंपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते सिध्दार्थ सोनवणे यांना प्रदान करण्यात आला सोनवणे यांना महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमधु सुद्धा पुरस्कार मिळालेले आहे हा पुरस्कार सिद्धार्थ सोनवणे यांच्या जिवनातील ३१ वा पुरस्कार आहे या अगोदर ३० पुरस्कार मिळालेले आहे सोनवणे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल बनोटी व परिसरातील आणि सोयगाव तालुक्यातील सिध्दार्थ सोनवणे यांच्यावरती शुभेच्छांचा मोठा वर्षाव होत असुन मोठे कौतुक व अभिनंदन होत आहे

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *