धाराशिव : उमरगा तालुक्यातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर यशस्वी विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दि.१५ रोजी सत्कार करून शुभेच्छा दिल्या . यात आईस हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा कागा हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी व लदाख येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये निवड झालेल्या साई प्रताप राठोड, ओम राठोड, सत्यगणेश गालीपील्ली यांचा तसेच राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त केलेल्या कु.अस्मिता पाटील व डॉ.बाबासाहेब विद्यापीठीय ज्युडो स्पर्धेत गोल्ड मेडल पटकवलेल्या कु.सुहानी घोडके या सर्व विद्यार्थ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. साई स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख प्रताप राठोड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी राष्ट्रवादी युवक चे जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष सुशील दळगड़े, मुरूम शहराध्यक्ष विठ्ठल पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे प्रताप महाराज युवक मुरूम शहराध्यक्ष बाबा कुरेशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सचिन बिद्री