धाराशिव : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे उमरगा तालुक्यातील दाबका गावचे सुपुत्र बाळासाहेब अशोकराव माने यांचे मराठा आरक्षणासाठी खुप मोठे योगदान असून तब्बल तिसऱ्यांदा ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे या लढ्यासाठी पुन्हा सक्रिय झालेत. २०२० मध्ये उमरगा ते मुंबई पायी प्रवास करून मराठा आरक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली होती,तसेच २०२३ मध्ये योगेश केदार यांच्या सोबत तुळजापूर ते मुंबई पायी प्रवास करून चार महिने लढ्यात सहभागी झाले होते.२०२४मध्ये संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक लढ्यासाठी अंतरवाली सराटी ते मुंबई पायी प्रवास ते करणार आहेत यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे यांनी उमरगा शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथे त्यांचा सत्कार केला.
या वेळी कृष्णा जमादार,सुरज भोसले, प्रेमनाथ शिंदे, रामेश्वर सुर्यवंशी,धिरज गायकवाड, रूद्रा स्वामी, नेताजी गायकवाड, हिराजी पवार उपस्थित होते. सर्वांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सचिन बिद्री