ब्रेकिंग न्यूज
प्रतिनिधी आयुब शेख
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरातील एका युवकाचे अपहरण होते अपहरणंकर्ते फोन करून संबंधित कुटुंबाला खंडणी मागतात, पिडीत कुटुंबातील सदस्य पोलिसांना माहिती देताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या समयसूचकता व मार्गदर्शनाने नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या आठ तासात अगदी फिल्मी स्टाईलने त्या चारही आरोपीच्या मुसक्या आवळल्या ..
हिंगोली जिल्ह्यातील एका खंडणीखोर टोळक्याने अपहरण करून चार लाखाची खंडणी मागणी केल्या प्रकरणी चार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून नळदुर्ग पोलिसांनी ८तासात फिल्मी स्टाईलने पकडून आरोपीस जेरबंद केले आहे.
ही घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील..पोलीसांकडून प्राप्त माहिती अशी की , पाटील तांडा खुदावाडी येथील सुधीर शिवाजी राठोड यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला.. आपल्या विहिरीवरील मुरूम रोडच्या कामासाठी पाहिजेत विकायचे आहेत का?असे बोलुन सुधीर राठोड यांना पाटील तांडा येथील जिजामाता बालकाश्रम येथे बोलावून घेतले . विहिरीवरील मुरूम प्रति हायवा खेप दरही ठरले आमचे रोडचे साहेब पुढे वागदरी पाटी वर थांबलेत चला जाऊ उचल द्यायला लावतो असे सांगितले असता सुधीरने स्वतःची मोटरसायकल एका खंडणीखोरास दिले व सुधीर राठोड यास लाल रंगाच्या चारचाकी कारमध्ये बसवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील डोंगराळ घेऊन गेले. खंडणीखोरानी चार लाख रुपयांची मागणी केली खंडणीखोरांच्या एका मोबाईल वरून सुधिरने पत्नी राजश्री यांना ही माहिती दिली असता पत्नी राजेश्री सुधीर राठोड यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक गोवर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख , यांच्या आदेशानुसार तर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे .यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस पथकाने अवघ्या ८ तासात सुधीर राठोड यांची सुटका करून हिंगोली जिल्ह्यातून चार आरोपींना पकडण्यात यश आलय. सचिन बापुराव राठोड , अरविंद नागोराव राठोड , विकास शेषेराव राठोड राहणार अंजनवाडा तांडा औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली व अरविंद रुसतुंग चव्हाण राहणार गलांडी तांडा औंढा नागनाथ यांच्या विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे .
याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे , स.पो.नी जी आर तायवडे , पोलीस निरीक्षक एस एस देवकर , पोलीस निरीक्षक संजय झराड , पोलीस शिपाई अविनाश दांडेकर , दिगंबर नेलवाडे , मोरे , जांभळे होमगार्ड सुनील जाधव यासह पोलिसांनी परिश्रम घेतले .
22 रोजी या प्रकरणातील आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज देवकर . हे करीत आहेत .
या प्रकरणातील मुख्य आरोपी केव्हा गजाड होणार याकडे सर्वांचे लक्ष