पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे मोठी यांची धडाकेबाज कारवाई …!
प्रतिनिधी (आयुब शेख )
तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा यात्रा मध्ये चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणांवर पोलिसांची अशी पाच पथकं तैनात करण्यात आली होती. त्यामुळे गर्दीत भाविकांचे खिसा साफ करणाऱ्या, मोबाइल व महिलांची पर्स लंपास करणाऱ्या तब्बल 13 चोरांच्या 7 महिलांचा मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले.
अवैध दारू विक्री करणाऱ्या 7 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा – बाणाई विवाहस्थळ असलेल्या श्री खंडोबाची पौषपौर्णिमा महायात्रा बुधवार आणि गुरुवारी पार पडली. या दोन दिवसांत किमान पाच लाख भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेऊन , भंडारा (हळद ) – खोबरे यांची मुक्तपणे उधळण केली, त्यामुळे सर्व भाविक सोन्याच्या रंगाने न्हाऊन निघाले होते.येळकोट, येळकोट जय मल्हार जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

लाखोंची गर्दी होऊनही शांततेत पार पडली. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी भाविकांचा खिसा रिकामा केला. याच गर्दीतून पोलिसांनी 16 चोरट्यांना ताब्यात घेत अडीच 26.000रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला..
तपशील माहिती
नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-पांडुरंग बाबुराव सांडुर, रा. मोतीनगर लातुर ता. जि. लातुर हे त्यांचे कुटूंबासह खंडोबा मंदीर मैलापूर येथे देवदर्शनासाठी रांगेत उभा असताना त्यांचा अंदाजे 8,000 ₹ किंमतीचा रेडमी 9 (ए) मोरपंखी रंगाचा हा दि. 25.01.2024 रोजी 03.00 वा. सु. संशयीत आरोपी नामे- चंद्रकांत अंबादास जाधव, वय 34 वर्षे, रा कवठा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी जबरीने चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पांडुरंग सांडुर यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 392 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी पांडुरंग सांडुर यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयीत आरोपी नामे- चंद्रकांत अंबादास जाधव, वय 34 वर्षे, रा कवठा ता. उमरगा जि. धाराशिव यास मैलापूर येथील खंडोबा यात्रेतुन ताब्यात घेवून त्याचे कडे नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन नळदुर्ग पोलीसांनी नमुद आरोपीस अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-राहुल दाजी इंगळे, वय 35 वर्षे, रा. राजुरी ता. जि. धाराशिव हे त्यांचे त्यांचा भाउ किरण इंगळे व मित्र प्रदिप घोगरे असे खंडोबा मंदीर मैलापूर येथे देवदर्शनासाठी रांगेत उभा असताना फिर्यादी हे वॉशरुमला गेले असता त्यांचे पॅन्टचे खिशातील अंदाजे 12,000 ₹ किंमतीचा वन प्लस मॉडेल कंपनीचा मोबाईल हा दि.25.01.2024 रोजी 16.00 वा. सु. संशयीत आरोपी नामे- आकाश बाळू पवार, वय 25 वर्षे, रा कवठा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी जबरीने चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल इंगळे यांनी दि.25.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 392 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी राहुल इंगळे यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयीत आरोपी नामे- आकाश बाळू पवार, वय 25 वर्षे, रा कवठा ता. उमरगा जि. धाराशिव यास मैलापूर येथील खंडोबा यात्रेतुन ताब्यात घेवून त्याचे कडे नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन नळदुर्ग पोलीसांनी नमुद आरोपीस अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-भाग्यश्री गोविंद सुर्यवंशी, वय 38 वर्षे, रा. आरोग्य नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे त्यांचे कुटूंबासह खंडोबा मंदीर मैलापूर येथे देवदर्शनासाठी खंडोबा मंदीरा समोर यात्रेमध्ये डिकमळी जवळ रांगेत उभा असताना त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र कारले असे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 24,000 ₹ किंमतीचे हे दि.25.01.2024 रोजी 05.00 वा. सु. संशयीत आरोपी नामे- सुनिता नानासाहेब पंडीत रा. पाथरुड ता. भुम जि. धाराशिव यांनी जबरीने चोरुन नेले होते. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भाग्यश्री सुर्यवंशी यांनी दि.26.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 392 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी भाग्यश्री सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयीत आरोपी नामे- सुनिता नानासाहेब पंडीत रा. पाथरुड ता. भुम जि. धाराशिव हिस मैलापूर येथील खंडोबा यात्रेतुन ताब्यात घेवून तिचे कडे नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
यात्रेमध्ये गावठी दारू विकणाऱ्या चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यावरुन नळदुर्ग पोलीसांनी नमुद आरोपीस अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
नळदुर्ग (मैलारपूर ) श्री खंडोबाच्या यात्रेत चोरांची टोळी, 7 महिलांसह 13 भामटे जेरबंद पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे सर्व टीमचे मोठी कारवाई झाल्याने गाव परिसरातून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं जात आहे.