section and everything up until
* * @package Newsup */?> *राज्यस्तरीय घरगुती शिवजयंतीसजावट स्पर्धेचे आयोजन | Ntv News Marathi

शिवजयंतीनिमित्त१९ ते २१ फेब्रुवारी
दरम्यान स्पर्धेचे आयोजन


प्रतिनिधी……आम्ही सारे शिवप्रेमी,क्षात्रविर संभाजी क्रीडा व युवक प्रतिष्ठान आयोजित व जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी व युवराज संभाजीराजे मित्रमंडळ संयोजित राज्यस्तरीय संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड मध्ये या स्पर्धेची नोंद असून ९ वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे.दि.१९,२० व २१ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
            या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस २१००० रुपयांचे असून ऍड.श्री.यशवर्धन ठाकूर,मोझरी यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे तर द्वितीय बक्षीस ११००० रुपयांचे असून जिजाऊ बँक,अमरावती यांच्या कडून देण्यात येणार आहे.
तृतीय बक्षीस ५००० रुपयांचे असून शिवश्री अंकुश खरड,अमरावती यांच्याकडून देण्यात येणार असून चतुर्थ बक्षीस २५०० रुपयांचे असून युवा इनोव्हेटर कु.साक्षी धनसांडे,वणी यांच्याकडून तर विषेश बक्षीस ५००० रुपयांचे असून श्री.गजानन अंबादासराव कुचे, वीर्शी यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे.
या स्पर्धेची संकल्पना तथा मुख्य संयोजक डॉ. तुषार देशमुख(9730015899) आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ.तुषार देशमुख यांनी केले आहे.
या स्पर्धेत मराठा सेवा संघ,अम.जिल्हा शा. शिक्षक संघटना,संगीतसुर्य केशवराव भोसले सां.परिषद,महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच व सर्व शिवप्रेमी संघटनांचा सहभाग आहे. स्पर्धेचे विषय :-
१) शिवराज्याभिषेक
२) छत्रपती शिवरायांचे आरमार
•स्पर्धेत सहभागी सर्व मावळ्यांनी आपल्या घरी शिवरायांच्या मूर्ती किंवा फोटोचे पूजन करून आकर्षक व नाविन्यपूर्ण सजावट दि.19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान करावी.
सजावटीचे कोणतेही तीन फोटो आपल्या कुटुंब, शेजारी व मित्रमंडळीसह काढून खाली दिलेल्या कोणत्याही एका संयोजकाच्या व्हाट्सएप नंबरवर पाठवावा.त्यात आपला संपूर्ण पत्ता (मोबाईल नंबर सह) टाकावा व व्हिडीओ जास्तीत जास्त दोन मिनिटांचा टाकावा.

उत्कृष्ट अशा सजावटीचे परीक्षण करण्यासाठी आयोजकांचे प्रतिनिधी परीक्षण करण्यासाठी 3 दिवसांत आपल्या घरी येतील. या स्पर्धे करीता ‘अ’ गट वय वर्ष ५ ते १६ व ‘ब’ गट वय वर्ष १७ ते ३० अशा दोन गटात मावळ्यांना सहभागी होता येईल. राज्यस्तरावर उत्कृष्ट आठ स्पर्धकांना दोन गटात(‘अ’ व ‘ब’) असे विभागून सर्व बक्षिसे देण्यात येईल. गुणांकन हे विषयाची मांडणी,कौटुंबिक सहभागी,वेशभूषा, सामाजिक संदेश,प्रचार प्रसार व मागील वर्षाचा सहभाग या मुद्यावर आधारित असेल. असे संयोजन समितीच्या मनाली तायडे, हर्षा ढोक, लीनता पवार, निखिल काटोलकर, रीद्धेश ठाकरे, अजय इंगळे, अजित काळबांडे सूमित रीठे यांनी केले आहे असे स्पर्धेचे प्रसिध्दी समितीचे संतोष शेंडे यांनी कळवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *