प्रतिनिधी नळदुर्ग
सर्वोच्च न्यायालयाच्या 2006 च्या निर्णयानंतर देशभरात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणे स्थापन झाली. या प्राधिकरणांच्या पहिल्या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत येथील उमाकांत मिटकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सहभाग नोंदवला हि नळदुर्गवासियांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.
दि-5-2-24 रोजी हरियाणा हाऊस,चंदिगड येथे झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.मनोहर लाल, गृहमंत्री श्री.अनिल वीज यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेची प्रस्तावना निवृत्त आयएएस, हरियाणा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती.नवराज संधू यांनी केली.
ही प्राधिकरणे स्थापन होण्यासाठी अनेक वर्ष लढा दिलेले उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलीस महासंचालक श्री.प्रकाश सिंग यांनी यामागची पार्श्वभूमी सांगितली. ब्रिटिशकालीन कायदे पद्धती, स्वातंत्र्यानंतरच्या पोलिस सुधारणांसाठी स्थापन झालेल्या सोराबजी,रिबेरो सारख्या अनेक समित्या,राजकीय हस्तक्षेप त्यानंतर 2006 सालचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय यावर सविस्तर सत्र घेतले.
देशभरातील आलेल्या प्रतिनिधींनी यावेळी त्या त्या राज्यात असलेली राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणांची स्थिती,नियम,कार्यपद्धती,असणाऱ्या अडचणी,देशभरातील नागरीकांसाठी या माध्यमातून पोलीस यंत्रणेविरूद्ध न्याय मागण्यांसाठी सुरू झालेल्या अनुभवांवर मांडणी केली.
सदरील कार्यशाळेत गोवा,झारखंड उत्तराखंड, केरळ, हरियाणा,दिल्ली,राजस्थान,महाराष्ट्र आंध्र प्रदेश,आसाम, त्रिपुरा यासह त्या त्या राज्याच्या प्राधिकरणावरील उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती,आयएएस,आयपीएस,पोलीस अकादमीचे अधिकारी,पोलीस महासंचालक उपस्थित होते.