उमरखेड/ प्रतिनिधि:
भारतीय जनता पक्षाच्या उमरखेड शहराध्यक्ष पदी उमरखेड येथिल युवा सक्रीय कार्यकर्ते पवन मेंढे यांची निवड करण्यात आली.
पवन मेंढे हे अनेक वर्षापासून पक्षाचे काम करत असून ते मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत. भारतीय जनता पक्षाने प्रथमच उमरखेड तालुक्यात वडार समाजातील युवकाला प्राधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. तालुक्यातील वडार समाज या नियुक्ती मुळे समाधानी असून भविष्यात उमरखेड शहरातील प्रत्येक घटकातील प्रत्येक नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनेचा लाभ मिळून देणार असल्याचा निर्धार पवन मेंढे यांनी युवाराष्ट्र दर्शन च्या प्रतिनिधि ला बोलतांना व्यक्त केले. या नियुक्तीमुळे आगामी विधानसभा लोकसभा नगरपरिषद व सर्व निवडणुकांमध्ये फायदा होईल हे मात्र नक्की.
या नियुक्तीचे श्रेय भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा , आ.नामदेव ससाणे, मा.आ.उत्तमराव इंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, भा.ज.यु.मो. जिल्हाध्यक्ष ऍड.आदित्य माने , शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार सर, जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर, जिल्हा उपाध्यक्ष अजय बेदरकर सर, तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, अतुल खंदारे, लक्ष्मीकांत मैड, परमानंदजी कदम पाटील आदींनी नियुक्तीचे श्रेय दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *