भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची पत्रकार परिषदेत माहिती
उमरखेड:- विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या वर निधी उपलब्ध झाला असून या उपलब्ध झालेल्या निधीतून रस्ते विकास, धार्मिक स्थळ विकास, व पर्यटन स्थळांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून उपलब्ध झालेल्या निधीतून बहुतांश विकास कामांना सुरुवात देखील झाल्याची माहिती भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दिनांक 12 मार्च रोजी लोटस या त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे रस्ते विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती देताना त्यांनी पुसद ते हरदडा या 58 किलोमीटर आंतर असलेल्या रस्त्याच्या कामासाठी तब्बल २४१ कोटी रुपयांचा निधी, विडुळ देवसरी रस्त्याच्या १९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ७६ कोटी रुपयांचा निधीला मंजुरात मिळाली असून या दोन्ही रस्त्याची कामे ham या योजने मधून होणार असून या दोन्ही रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे देवसरी येथील पैनगंगा नदीवर 65 कोटी रुपये खर्ची घालून पूल वजा बंधाऱ्याच्या काम,चातारी पैनगंगा नदीवर वीस कोटी रुपये खर्ची घालून पूल वजा बंधाऱ्याचे काम तसेच तीवरंग पैनगंगा नदीवर 65 कोटी रुपये खर्च घालून पूल वजा बंधाऱ्याचे काम तसेच उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 30 पु लांची कामे मंजूर झाल्याची माहिती यावेळी बोलताना नितीन भुतडा यांनी दिली पर्यटन स्थळांच्या विकासासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून यातून श्रीक्षेत्र अंबाळी देवस्थान अमृतेश्वर महादेव मंदिर हरदडा धानोरा येथील बालाजी मंदिर उमरखेड शहरातील जगदंबा मंदिर, शहरातीलच सिद्धेश्वर महादेव मंदिर, स्वामी समर्थ मंदिर,फुलसावंगी येथील पुनेश्वर महादेव मंदिर,अंबोडा येथील गजानन महाराज मंदिर, हिवरा येथील एकविरा देवी मंदिर यासह विविध देवस्थानांच्या विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीला मंजुरात मिळाली असून यातून धार्मिक स्थळांचा विकास मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच पर्यटन स्थळांच्या विकास कामांसाठी देखील कोट्यावधी रुपयांच्या निधीला मंदिरात मिळाली असून यातून शहरालगत असलेल्या अंबवन तलाव व उमरखेड शहरात भव्य दिव्य अशा तारांगण केंद्राच्या निर्मितीसाठी देखील निधी उपलब्ध करण्यात आला असून यातून शहरातील तारांगण केंद्राच्या निर्मितीमुळे उमरखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांसह आजूबाजूच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना या तारांगणाचा लाभ घेता येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले तसेच 25 / 15 योजनेअंतर्गत देखील उमरखेड विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणच्या विकास कामांना सुरुवात झाली असून ती कामे प्रगतीपथावर असून शासनाच्या आदिवासी विभागाकडून ठक्कर बाबा योजनेअंतर्गत देखील रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध झाला असून यातून आदिवासी बहुल भागातील उमरखेड व महागाव या दोन्ही तालुक्याचा विकास साधला जाणार आहे बंदी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी देखील सर्व अडचणीतून मार्ग काढीत बंदी भागातील रस्त्यांचा देखील विकास होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले पैनगंगा नदीच्या पुराने बाधित असलेल्या देवसरी येथील पूरग्रस्त घरांच्या पुनर्वसनासाठी उमरखेड शहरालगत असलेल्या आयटीआय कॉलेज जवळील जमिनीवर पुरबाधित लोकांचे पुनर्वसन होणार असून पुनर्वसनाच्या विकास कामांसाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यासाठीची निविदा देखील प्रकाशित झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या उपलब्ध निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास होणार आहे नगरपालिका क्षेत्रात शाळेच्या इमारती साठी निधी उपलब्ध झाला आहे तसेच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तिपीठ हा महामार्ग नव्यानेच निर्माण होणार असून या शक्तिपीठ महामार्गाचा लाभ उमरखेड व महागाव या दोन्ही तालुक्यांना व्हावा म्हणून विशेष प्रयत्न करून शक्तिपीठ महामार्ग उमरखेड व महागाव या दोन्ही तालुक्यातून जाण्यासाठी आमदार नामदेवराव ससाने व आपण स्वतः वेळोवेळी पाठपुरावा करून मंजूर केल्याची माहिती यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली या पत्रकार परिषदेला आमदार नामदेव ससाने भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन रावते भाजपा जिल्हा महामंत्री महेश काळेश्वर कर उमरखेड महागाव विधानसभा सहसंयोजक अजय पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.