जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ पंकज आशीया
निवडणूक कामात अधिकारी व कर्मचारी यांनी दक्ष राहावे
उमरखेड:- दि १२ ( उमाका ) आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय छत्रपति संभाजी महाराज उद्यान उमरखेड येथे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यवतमाळ डॉ पंकज आशीया यांचे अध्यक्षते नोडल अधिकारी व सेक्टर अधिकारी सेक्टर पुलिस अधिकारी यांची आढावा सभा घेण्यात आली. 2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत शांततेत व पारदर्शकपणे पारपाडावी या साठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी वर्गाने कर्तव्यात कसुर न ठेवता दक्ष रहावे. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले. 15 हिंगोली लोकसभा मतदार संघात उमरखेड विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहे. उमरखेड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय छत्रपति संभाजी महाराज उद्यान उमरखेड येथे अधिकारी कर्मचारी यांची कामकाजाचा आढावा सभा घेण्यात आली डॉ पंकज आशीया यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी उमरखेड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र तेथील उपलब्ध सुविधा व सुरक्षा या विषयीचा आढावा घेतला.
बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की निवडणुकीचे काम हे अत्यंत जबाबदारी चे असते. अधिकारी कर्मचारी वर ज्या कामाची जबाबदारी सोपविलेली आहे त्या कामाची त्यांनी पूरे-पूरे माहिती करुन घ्यावी म्हणजे दिलेली जबाबदारी यशस्वीपने पार पाडण्यास अडचन येनार नाही. मतदान केंद्रच्या ठिकाणी विज पाणी व इतर आवश्यक सुविधा संबंधित यंत्रनेनी तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना ही त्यांनी बैठकीत दिल्या व या निवडणूकी साठी जाहिर झालेल्या आचार संहितेच्या काळात कोणी ही आचार संहितेचे उल्लंघन करू नये असे आवाहन हि जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केले. या सभेला उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सखाराम मुळे, उमरखेड तहसीलदार आर यू सुरडकर, गट विकास अधिकारी प्रविण कुमार वानखेडे, न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश जामनोर,महागाव तहसीलदार सिध्देश्वर वरणगांवकर, नायब तहसीलदार वैभव पवार, नायब तहसीलदार एस डी पाईकराव, उमरखेड पोलीस निरिक्षक, आदि प्रमुख उपस्थित होते. या आढावा सभेला मतदार संघात नेमण्यात आलेल्या क्षेत्रिय अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, प्रतिनिधि आदि उपस्थित होते.