उमरखेड :
शहरातील एम आय एम पक्षाची कार्यकारणी काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती त्यामुळे संघटनात्मक कामे संथ गतीने सुरू होती त्यामुळे एमआयएम चे जिल्हाध्यक्ष सय्यद इरफान यांनी पक्षवाढ व संघटनात्मक दृष्टीने दि 10 मार्च रोजी येथील एमआयएम कार्यालय नांदेड रोड येथे मोहम्मद शहाबुद्दीन कुरेशी यांची तालुकाध्यक्ष पदी तर सय्यद अफसर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे .
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सय्यद इरफान यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलतांना येणाऱ्या आगामी लोकसभा विधानसभा तसेच नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात संघटनात्मक कार्य कशा प्रकारे करायला पाहिजे ज्यामुळे पक्ष बळकट होईल त्याचबरोबर एका पदाधिकाऱ्यांनी किमान दहा कार्यकर्ते जोडले पाहिजे त्यामुळे पक्ष बळकट होईल असे सांगितले .
यावेळी माजी नगरसेवक रसूल पटेल, प्रतिनिधी शेख वसीम, इरफान नदवी ,युथ शहराध्यक्ष शबिरुद्दीन ,इनायत भाई, सिद्दीक राज ,वजाहत मुजावर, अजिज पटेल, नजीर आतिश ,शेख इमरान ,सय्यद फराज सह मोठ्या संख्येने एम आय एम चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .