उमरखेड -/ भारतीय जनता पार्टीच्या यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा यवतमाळ-वाशिम लोकसभेचे प्रभारी नितीन भुतडा यांचे जन्मदिनानिमित्त दि.7 मार्च रोजी आयोजित सांस्कृतिक महोत्सवास हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती.
नितीन भुतडा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित जि.प. मुलांच्या शाळेच्या मैदानावर आयोजित सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राच्या हाश्यजत्रेतील कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवीत हजारो प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
व्यासपीठावर हिंगोली लोकसभेचे खा.हेमंत पाटील, स्थानिक आ.नामदेवराव ससाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, संजय पूज्जलवार आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात नितीन भुतडा यांचा भव्यदिव्य गुलाब पुष्पहार अर्पण करून जन्मदिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या.
राज्यातील घराघरात मनोरंजन वाहिनीवरून पोहचलेल्या ‘महाराष्ट्राच्या हाश्यजत्रा’ या प्रसिध्द विनोदी शो मधील अंशुमन विचारे, प्राजक्ता गायकवाड, शिवाली परब,प्राजक्ता हनमघर,प्रभाकर मोरे या कलाकारांच्या विनोदाने प्रेक्षकात कमालीचा हश्या पिकला. तर सुप्रसिद्ध गायक अक्षता सावंत, चेतन लोखंडे यांचे मोहक गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विनोदी एक्सप्रेस निवेदक जयंत भालेराव यांचीही त्यात भर पडली. तर प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माधुरी पवार हिने आपल्या अस्सल पारंपरिक लावणी नृत्याने प्रेक्षकांमधून टाळ्या व शिट्ट्यांची प्रचंड दाद मिळविली. लावणीचा खणखणीत ताल सुरू होताच उपस्थित तरुणाईने जल्लोषात थिरकण्यास सुरवात केली.
दि.7 मार्च रोजी सकाळी 8 वाजता औदुंबर वृक्षारोपण समिती द्वारे वाढदिवस गार्डन व देवीच्या टेकडी परिसरात वृक्षपूजन पार पडले. तर सकाळी 10 वाजता स्वप्नपूर्ती ग्रुपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नितीन भुतडा यांची फळ तुला करण्यात आली. तर 11 वाजता श्रीराम मंगल कार्यालयात अतुल खंदारे मित्र परिवाराच्या वतीने भुतडा यांची भव्यदिव्य लाडू तुला भाजपा प्रदेश कार्येकारिणी सदस्य प्रा.दिनेश सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेत करण्यात आली.
यावेळी अजय बेदरकर यांनी आपल्या मनोगतात नितीन भुतडा यांचा कार्ये गौरव करीत त्यांच्या कामाची पद्धत विशद केली. “आज राजकिय व्यक्तीचा वाढदिवस नाही तर नितीन भुतडा नामक कार्याचा आज वाढदिवस आहे “असे उदगारताच प्रेक्षकांत टाळ्यांचा गडगडाट झाला. तर प्रास्ताविकात अतुल खंदारे यांनी निर्भीड, कार्येकर्त्यांवर निस्सिम प्रेम करणारा नेता म्हणून भुतडा यांना संबोधले. तर महेश काळेश्वरकर यांनी कर्तृत्वाचा परीघ संबोधले. सत्कार सोहळ्यास भावूक अवस्थेत उत्तर देतांना नितीन भुतडा यांनी आपणाकडून केला जाणारा सत्कार म्हणजे जबाबदारी वाढविणारा क्षण आहे. जनसेवेच्या माध्यमातून आपल्या ऋणातून उत्तराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मनोगत यावेळी भुतडा यांनी व्यक्त केले.
उत्तर सदर लाडू तुला सोहळ्याचे सूत्रसंचालन भाजपा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन पवन मेंढे यांनी केले.
◆बॉक्स- सांस्कृतिक महोत्सवा दरम्यान खा.हेमंत पाटील यांचे शुभहस्ते नितीन भुतडा App चे लोकार्पण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *