(महागाव तालुक्यातील इजनी येथील युवकांनी पकडली एकनाथ शिंदेची साथ)
शिवसेना शिंदे गटात सद्या इंकमिंग सुरू असून अनेक युवक जाहीर प्रवेश घेत आहे त्याच अनुषंगाने ईजनी येथील युवकांनी खा.हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणीला प्रथम प्राधान्य देत अनेकांना आपल्या पक्षात सामील करून घेतल्या जात आहेत .हिंगोली लोकसभा क्षेत्राचे शिवसेना(शिंदे)गटाचे खा.हेमंत पाटील यांनी सुद्धा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटन मजबुत करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असुन त्यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांचा शिवसेना पक्षात प्रवेशाचा सपाटा चालु आहे.विकास कामांच्या भुमीपुजन सोहळ्यानिमित्त दिनांक५मार्च रोजी रात्री १२वाजताच्या दरम्यान खा.हेमंत पाटील हे ईजनी येथे पोहचले असता तेथील प्रफुल चव्हाण, शक्तिमान पवार , अभय पवार , तुफान पवार, बालाजी चव्हाण ,विजय चव्हाण , बादल जाधव, सुशांत राठोड ,दिनेश चव्हाण, तेजस राठोड, सुशांत सा राठोड ,योगेश जाधव, घनश्याम जाधव ,शिव चव्हाण ,अजय पवार , सुरज राठोड ,सुमित पवार, सौरभ राठोड, शुभम राठोड ,गोलू जाधव ,योगेश पवार, गणेश हजारे, राजेंद्र नरवाडे, अनिल काकडे, विश्वास फुलाने, रितेश राठोड, शक्तिमान जाधव, दीपक राठोड, रितेश राठोड, ऋषिकेश आडे, रितेश पवार यांच्यासह असंख्य युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख माजी जि.प.सदस्य डॉ बी एन चव्हाण चव्हाण, तालुका प्रमुख,माजी नगरसेवक राजु राठोड, तुकाराम उमरे ( उप तालुका प्रमुख) , नितीन चव्हाण (शाखा प्रमुख) रमेश चव्हाण,युवा सेनेचे अरविंद पवार उपस्थित होते