जामखेड येथील कै सुवालाल भगवानदास कोठारी सामाजिक प्रतिष्ठान आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने परमपूज्य आचार्य सम्राट
आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृती दिनानिमित्त भव्य ॲक्युप्रेशर सुजोक थेरपी शिबिर ७ दिवसासाठी ठेवण्यात आले आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी दिली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गणेश माळी तहसीलदार जामखेड, कार्यक्रमाचे उद्घाटक महालिंग डोंगरे प्राचार्य जामखेड महाविद्यालय जामखेड हे राहणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पोळ गटविकास अधिकारी पंचायत समिती ,कांतीलाल कोठारी उद्योजक, डॉक्टर अमोल भगत एम.बी.बी.एस. एम.डी. मेडिसिन ,डॉक्टर विशाल हारकर एम.बी.बी.एस एम.एस.आर्थो, विनोद बेदमुथा सदस्य जैन श्रावक संघ, जितेंद्र बोरा सदस्य जैन श्रावक संघ ,पांडूराजे भोसले अध्यक्ष श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , नासीर पठाण अध्यक्ष पत्रकार संघ,प्रवीण शेठ छाजेड उद्योजक , श्रीकांत होसिंग प्राचार्य ल.ना. होशिंग विद्यालय जामखेड,ॲड. नवनीतलाल बोरा ,डॉ. प्रताप गायकवाड ,डॉ. सुरेश काशीद, मनोज दुग्गड उद्योजक ,संतोष गुंदेचा, सुभाष भळगट, अशोक चोरडिया साखर सम्राट ,अमित चिंतामणी मा.नगरसेवक नगर परिषद जामखेड ,सुभाष भंडारी, प्रफुल्ल सोळंकी, सुमित चाणोदिया, सुनील जगताप ,राहुल घोरपडे, अनिल फिरोदिया ,ऋषिकेश,( बिट्टू ) मोरे ,संतराम सुळ , मिठूलाल नवलाखा, साहिल भंडारी ,वैभव कटारिया, महेंद्र प्रकाश बोरा, रोहिदास केकान हे उपस्थित राहणार असून
डॉ. राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थेचे डॉक्टरांद्वारे उपचार .
डॉ. आर. पी. भाटी एम.डी.ॲक्यु प्रेशर थेरपी महेंद्र पितानी हे करणार आहेत तसेच ॲक्युप्रेशर ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ॲक्युप्रेशर पॉईंट हाताच्या व पायाच्या तळव्यावर असतात जेव्हा आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवायाला आजारपण येते तेव्हा ते पॉईंट बिघडलेले असतात या पॉईंटवर ॲक्युप्रेशर सुजोग थेरपी या उपचाराच्या पद्धतीने प्रकृती हळूहळू सुधारत आजार विना औषधाने बरा होतो तसेच रक्तप्रवाह सुरळीत होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढते व रुग्णास बरे वाटू लागते सर्व समाजातील वयोगटातील स्त्री-पुरुषांचे सर्व आजारावर नैसर्गिक पद्धतीने उपचार होणार आहेत तरी सर्व समाजातील रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा यासाठी सात दिवसाची नॉमिनल फी २००=०० रुपये ठेवण्यात आलेली आहे तसेच शिबिर रविवार दि. ७/४/२०२४ ते शनिवार दि. १३/४/२०२४ पर्यंत सकाळी ८=०० (आठ) ते १२=००(बारा )आणि दुपारी ४=००(चार) ते ४=००(आठ) वाजेपर्यंत होणार आहे शिबिर महावीर भवन नगर रोड जामखेड येथे होईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राहुल राखेचा यांनी दिली
या शिबिराची नाव नोंदणी
राहुल राखेचा पारस ऑटोमोबाईल्स
९०२८४९२५२७
सचिन गाडे ९१५६९६९८२३ यांच्या करे करावी
