भारत सरकार युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय (एन. एस. पी. ओ) यांची मान्यता प्राप्त
उमरखेड प्रतिनिधी :
युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्था (NSPO) ची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशन च्या यवतमाळ जिल्हा मुख्य निरीक्षक पदी क्रीडा प्रशिक्षक सागर शेरे यांची निवड दि 1 एप्रील रोजी स्टेअर्स फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष उपाध्याय , इंडिया स्पोर्टस् जनरल मॅनेजर मिश्रा व महाराष्ट्राचे अध्यक्ष बालाजी जोगदंड, महाराष्ट्र चिफ स्पोर्टस् कॉर्डिनेटर सुनिल शिंदे यांनी सर्वानुमते निवड केली.
मागील गत वर्षापासून जिल्ह्यामध्ये मैदानी,कबड्डी,खोखो,व्हॉलीबॉल, चेस, कराटे अशा अनेक खेळांचा प्रशिक्षण, प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी सागर शेरे यांच्यावर वरिष्ठांनी देण्यात आलेली आहे. शेरे हे खुप वर्षा पासुन यवतमाळ जिल्ह्यात सर्व खेळाच्या विकासाचे काम करीत आहेत. त्यामुळे खेळ क्षेत्रातून सागर शेरे यांचे भरभरून कौतूक होत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ निर्माण झाले असून जिल्ह्यातील सर्व तळागाळातील खेळाडूंना न्याय देण्याचे कार्य सागर शेरे करतील असे त्यांनी सांगीतले.