उमरखेड :-
महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दि .12 एप्रील रोजी रात्री 8:30 वाजता सिनेअभिनेता गोविंदा यांच्या नाग चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यन्त निघालेल्या रॅलीत गोविंदाला पाहण्यासाठी गर्दी केलेल्या पाकीटमारांनी आपले हाथ साफ करून गर्दीत आलेल्या अनेक दर्दींची हजारो रुपयांची पाकीटे मारून खिसे मोकळे केले .
सिने अभिनेता गोविंदा यांची रॅली गायत्री चौकात आली असतांना गर्दीत घुसलेल्या पाकीटमारांनी गर्दीचा फायदा घेऊन अनेक जणांच्या खिशातील महत्वाच्या कागद पत्रांसह असलेली हजारो रुपयांची पाकीटे मारल्या गेली .यामध्ये सकाळ वृत्तपत्राचे तालुका बातमीदार अरविंद ओझलवार यांनाही याचा जबर फटका बसला आहे . त्यांच्या पाकीटामध्ये रोख रक्कम 4 हजार 800 रुपयांसह आधार कार्ड , पॅन कार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स अशी महत्वाची कागद पत्रे होती . सिने अभिनेता गोविंदाला पाहणे महागात पडले असल्याची प्रतिक्रिया ओझलवार यांनी व्यक्त केली .
महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ,सिने अभिनेता गोविंदाच्या रोड शो मध्ये पाकीटमारांनी केले हात साफ
