उमरखेड(ता.प्र.) :- आज रोजी महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात असलेली सत्यनिर्मिती महिला मंडळ उमरखेड याचे १६ वें वर्धापन दिवस विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून साजरे करण्यात आले. सत्यानिर्मित महिला मंडळ भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त महिला संघटन असून मागील सोळा वर्षा पासून सतत महिलांचे हक्कअधिकार साठी संघर्ष करत आहे तथा महिलांवर होणारे अत्याचार विरुद्ध सतत लढा देण्याचे काम करत आहे समाजात महिलांना समान सन्मान मिळावे या करिता सतत शासन दरबारी निवेदने देत आहे देशात जतियसालोखा कायम रहावा या साठी देशात आणि विशेष महाराष्ट्र राज्यात रक्षा बंधन,हळद कुंकू,ईदे मिलाद,संविधान दिवस,सावित्रीबाई फुले जयंती,फातिमा शेख स्मृती दिवस,ईद मिलन अशे अनेक जातीय सलोखा कार्यक्रम सत्यानिर्मितीं महिला मंडळ राष्ट्रीय अध्यक्षा सौ शबाना खान यांच्या मार्गदर्शनात महिला मंडळ विविध गावात आणि शहरात घेतात महिलांना सरसकट शिक्षण मोफत मिळावे या करिता “बेटी पढाव भविष्य बचाव” अशी वीणा अनुदानित योजना अभियान सुरू केले ज्या मुळे आज महाराष्ट्रात कित्येक गावी आठवी नंतर शिक्षण घेणारी विद्यार्थिनींनी लाभ घेताना दिसत आहे अशी निस्वार्थ संस्थेचे आज १६वे वर्धापन दीन असल्याने उमरखेड शहरात आज विविध सामजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शाळेत जाऊन मुलींना सुरक्षा संबंधी विश्लेषण ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस आणि आरोग्य विषयी चर्चा आणि फळ वाटप आणि स्लम एरियात राहणारे गरीब निराधार महिलांना संसार उपयोगी वस्तू भेट दिले आणि एम के गार्डन मध्ये सर्व धर्म सामजिक एकता टिकून राहावी आणि जतीयसालोखा असेच कायम राहावे या करिता ईद मिलन कार्यक्रम घेऊन वर्धापन दिनाची सांगता करण्यात आली या वेळी कार्यक्रमात विधानसभेतील नामांकित व्यक्ती विशेष यांनी आपली उपस्थिती दिली प्रशासन उच्च अधिकारी आणि कर्मचारी यांनी ईद मिलन कार्यक्रमाचे आनंद घेतले निवडणूक असल्याने कोणतीही चार संहिता भंग होणार नाही याची सर्वेसर्वा काळजी घेऊन सदर कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आले जातीय सलोखा कार्यक्रम मध्ये देशाची संस्कृती पोशाख परिधान करून महिलांनी वर्धापन दिानिमित्त सांस्कृतिक एकताचे उदाहरण दिले या वेळी सत्यनिर्मिती महिला मंडळ राष्ट्रीय अध्यक्षा संस्थपिका विश्र्वशांतीदुत पुरस्कार सन्मानित नारी शक्ती राज्य सरकार पुरस्कृत सौ शबाना खान यांनी सर्व मान्यवरांचे मना पासून आभार व्यक्त केले तसेच पत्रकार बंधू यांनी या कार्यक्रमात येऊन उपस्थिती दर्शविली याचे अध्यक्षा यांनी आभार मानले सर्व कार्यक्रम वेळेवर यशस्वीरित्या पार पडले आणि सर्व महिला सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास जी मेहनत घेतली त्याचे कौतुक सर्व प्रतिष्ठाने केले या वेळी सत्यनिर्मिती महिला मंडळ समिती डॉ वंदनाताई मरसुळकर,रेहाना शेख दादू,महेजबिन साजिद, सौ परवीन,सौ फर्झाना जावेद,सौ सविता निलेश पवार,सौ आनंदी पुरी,सौ तब्बसुम सय्यद,सौ रेहाना सिद्दी,सौ मिरा धाडे,सौ सविता भागवत,सौ कोमल शिलेश,सौ शांन्नो,सौ नसरीन बी व इतर सर्व महिला सदस्य तथा शेकडो च्य संख्येने नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.