मा.आजीनाथ हजारे
जामखेड प्रतिनिधी दिनांक 10/ 4/ 2024 रोजी ज्योती क्रांती पतसंस्थेचे चेअरमन मा. अजिनाथ हजारे यांचा 59 वा वाढदिवस निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, मुलां-मुलींना गोड-खाऊ, एक महिनाभर पुरेल एवढा धान्य किराणा व शैक्षणिक साहित्य देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी) ता- जामखेड जि- अहमदनगर या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, लोककलावंत, भटके-विमुक्त, दलित, आदिवासी घटकातील 83 मुला-मुलींच्या शिक्षणासाठी गेले 8 वर्षापासून हा प्रकल्प चालवला जातो या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नसून हे बालगृह संपूर्णपणे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून व लोकवर्गणीतून चालवले जात आहे,
या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन, अगदी टाळ्यांच्या गजरात स्वागत करुन गुलाबपुष्प व संस्थेचे "आम्ही घडलो" हे पुस्तक देऊन त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला, हजारे साहेब हे त्यांचा प्रत्येक वाढदिवस इतर ठिकाणी न साजरा करता तो खर्च टाळून निवारा बालगृहातील अनाथ, निराधार मुलां-मीलींना गोड खाऊ देऊन या मुलांमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला,
यावेळी बोलताना ज्योती क्रांती पतसंस्थेचे चेअरमन मा.आजीनाथ हजारे साहेब म्हणाले,मला या अनाथांमध्ये वाढदिवस साजरा करण्याने मला खूप मोठा आनंद मिळतो, कारण एक दिवस मी ही यांच्यासारखाचं अगदी सर्वसामान्य कुटुंबातील एक वेळचे अन्न पोटाला मिळत नव्हतं या परिस्थितीतून आलेलो आहे, म्हणून मी सामाजिक भावना समोर ठेवून या समाजामध्ये गोरगरीब, कष्टकरी, वंचित, अनाथ, वृद्ध, गोशाळा यांना सतत मदतीचा हात पुढे करत असतो.या संस्थेचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव साहेब व मी आम्ही दोघेही चळवळीतील कार्यकर्ते असून आम्ही परिवर्तनवादी महापुरुषांचे पाईक आहोत म्हणून तर आम्ही सामाजिक भान ठेवून ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांचा आधार होण्याचे काम करत आहोत. गेली पाच वर्षापासून सतत या संस्थेशी मी जोडून काम करत असल्यामुळे मला संस्था काय काम करते ही सांगण्याची गरज नाही, म्हणून तर मी या संस्थेची जोडून काम करत आहे, या संस्थेला ज्या ज्या वेळेस मदतीची गरज वाटेल त्या त्या वेळेस हक्काने मला हाक द्यावी, परंतु या बालगृहातून शिक्षण घेऊन पुढे जाणारा विद्यार्थी मोठ्या उच्च पदस्थानी जावा ही अपेक्षा बाळगतो कारण त्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान असेल,तसेच या बालगृहाच्या पुढील वाटचालीस त्यांनी भरभरुन अशा शुभेच्छा दिल्या,
यावेळी संस्थेची संपूर्ण माहिती प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण सर यांनी दिली,

यावेळी या वाढदिवसानिमित्त मा.आजीनाथ हजारे यांच्या पत्नी सौ.धनश्री हजारे,मा.किरण वर्पे, निलेश सोनवणे, सचिन टुबे, राजेंद्र शिंदे, राजेंद्र राऊत, ॲड.हर्षद वाळुजकर, महेश मुरुमकर,उमेश हजारे,संकेत हजारे अरविंद हजारे, दादासाहेब पुलवळे, तुकाराम शिंदे,सुरेखा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते आभार बालगृहाचे अधिक्षक वैजीनाथ केसकर सर यांनी मानले.
प्रतिनिधी नंदु परदेशी जामखेड अहिल्यानगर
मो नं 9765886124