नेहमीच धर्म आणि समाजासाठी मी चांगले काम करत आलो आहे. नाथांच्या भूमीतून आलो असून येथील भक्त निवास असो की वारकरी संस्था असो आपण त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे आलो आहे. त्यामुळेच संत महंत आणि वारकऱ्यांचा आशीर्वादामुळे मी छत्रपती संभाजीनर लोकसभा मतदार संघातून भरघोस मतांनी विजयी होईल, असा विश्वास शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांनी व्यक्त केला आहे. बीड बायपास येथे संत, महंत, वारकऱ्यांशी शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे म्हणाले, की मी दिलेला शब्द पाळतो. धर्माची, समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. पदावर बसल्यानंतर चांगले काम करावं. हा माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे. मंत्री झाल्यानंतर माझ्या डोक्यात हवा गेली नाही. नाथ मंदिराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. सामूहिक दहीहंडी बाहेर आणली. १० हजार लोक तेथे बसतात. १०० रूम बांधणार आहे. नाथांचे भक्त निवास नाही. ते काम करण्याचे भाग्य मला मिळाले. गाव, वाडी, वस्तीला स्वउत्पन्नातून २५० गावात भजनी साहित्य भेट दिलं. भजनाची गोडी लागावी, यासाठी हा माझा प्रयत्न आहे. वारकरी संस्थेला निधी दिला. १० गुंठे जागा उपलब्ध करून दिली. ज्यांच्या ज्यांच्या नावावर जागा आहे, त्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला. पैठणला संत पीठ सुरु केले. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी अहिल्यादेवी, महाराणा प्रताप, महात्मा जोतिबा फुले यांचे पुतळे स्व खर्चातून देण्याचं काम केले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. ३७० कलम हटविले . रामलाल्लाचे मंदिर बांधण्याचे काम केले. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. राज्यातील देवस्थानलां निधी देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने केले. मी संताच्या आशीर्वादाने पहिले काम शहराला पाणी देण्याचं काम करणार आहे. ते पण पैठणचे. ज्या ज्या वेळी गरज पडेल त्या त्या वेळी मी तुमच्या पाठीशी राहील. शहराची वाट लावली. मी पालक मंत्री झाल्यापासून या जिल्ह्याचा कसा कायापालट करता येईल, या कडे लक्ष देण्याचे काम केले. आपला ग्रामीण भागातील शेतकरी समाधानी होत असेल तर त्यापेक्षा पुण्याचे काम कोणते. जिल्ह्याच्या हिताची विविध विकास कामे केली. ५ – ६ कोटी रूपये ट्रान्स फॉर्मर साठी मिळत होते. आता ३२ कोटी दिले आहे. तुमच्या आदेशाला फार महत्व आहे. मी शब्द पाळणारा आहे. वारकरी भवनाचा विषय निकाली काढण्यासाठी प्रयत्न करील. संस्थानात हायमस्ट दिवे लावण्याचे काम केले. मी आपल्यातलाच आहे. आपल्या आशीर्वादाने मताधिक्याने निवडून येईल, यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी विनंती भूमरे यांनी केली. यावेळी हभप विष्णू महाराज नेमाणे म्हणाले, की सर्व महाराज मंडळी जमली आहे. आम्हाला तुमची गरज आहे. हिंदुत्वाचा नारा तर आपण देत आहोत. आता भूमरे यांना निवडून द्यायचे आहे. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. नवनाथ आंधळे महाराज म्हणाले, की पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अंगी संतांचे गुण आहे. त्यांनी पैठणला चांगले काम केले. म्हणुन त्यांना आम्ही वारकरी म्हणतो. सत्य आणि सत्ता एकत्र येईल तेंव्हा रामराज्य येईल. ते आपल्या बरोबर रात्रं दिवस सोबत असतात. धनुष्य बाण परंपरा जपायची आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बाण आहे त्यामुळे योग्य व्यक्तिमत्व मिळणार आहे. शहरात वारकरी भवन नाही. ते देतील असा विचार मांडला. शिवसेना महायुतीचे उमेदवार भुमरे यांना आंधळे महाराज राजकारणातला भोळा शंकर म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो, तुम्हीच विजयी व्हाल, अशी अपेक्षा केली. तूम्ही आमच्या शरीराचे रक्षण करा, आम्ही लोकांचे मन परिवर्तन करतो. तूम्ही निवडूण येनारच अशी खात्री आंधळे महाराज यांनी दिली. आभार हभप कडूबाळ गवांदे महाराज यांनी मानले. यावेळी बहुसंख्य वारकऱ्यांची उपस्थिती होती.