*डॉ जिवतोडे दवाखाना जवडचि घटना
*एक किलो ९२६ ग्रॅम गांजा जप्त
सावनेर शहरात पोलिसांनी चक्क एका जनरल स्टोर्समध्ये गांजाविक्री कर णाऱ्या आरोपीवर कारवाई करून एक किलो ९२६ ग्रॅम गांजा जप्त केला. आरोपीचा २८ मेपर्यंत पीसीआर (पोलीस कस्टडीरिमांड) घेण्यात येणार आहे. सावनेर हद्दीतील माहेश्वरी
ले-आउट, जीवतोडे हॉस्पिटलजवळ
राहणारा ओम जगदीश जनरल स्टोर्सचा चालक चिन्नोरकर हा आपल्या
दुकानात गांजा बाळगून ग्राहकांना
विक्री करीत असल्याची माहिती २३
मे रोजी मिळताच सावनेर पोलिसांनी
वरिष्ठांना याची सूचना दिली. त्यांनी
रेड करण्याचे आदेश दिले. सावनेर
विभागाचे साहाय्यक पोलीस अधीक्षक
अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात पोनि.रवींद्र मानकर, सपोनि. अनिल राऊत,पोउपनि. व्यंकटेश दोनोडे, अरुण राठोड, पोहवा. अनुल खोडणकर,नंदकिशोर मेश्राम, अविनाश बाहेकर,संगीता कोवे, सचिन लोणारे, भावेश शेंडे, नितेश पुसाम, चापोहवा. प्रीतम पवार यांनी नमूद ठिकाणी धाड टाकली असता चिन्नोरकर यांच्या ओम जगदीश स्टोर्समध्ये लाकडी रॅकखालच्या कप्प्यात प्लास्टीक बोरीमध्ये २० हजार रुपये किमतीचा एक किलो ९२६ ग्रॅम गांजा आढळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या तक्रारीवरून आरोपी जगदीश लखनलाल चिन्नोरकर(६२, रा. सावनेर) याच्याविरुद्ध कलम २०, २२ एनडीपीएस अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सपोनि. मंगला मोकासेकरीत आहेत.
(प्रतिनिधि मंगेश उराडे नागपुर जिल्हा)