*पाणीपुरवठा तiत्कiल नियमित करण्यात यावा असी गावकऱ्यांची मागणी
सावनेर तालुक्यातिल खापा वरुण काही अंतरावर सिरोंजि हे गाव असुन या सिरोंजी ग्रामपंचायत प्रशासना कडून नियमित पाणीपुरवठा
होत नसल्याने नागरिकiचा आरोप असुन गेल्या काही दिवसांपूर्वी नळ
योजनेच्या पाण्याची विद्युत मोटर
जळाल्याने सिरोंजी गावातील
पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
आठवडाभरापासून पाणीपुरवठा बंद
असल्याची नागरिकांची ओरड आहे.
पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत
आहेत.पाणीपुरवठा योजनेची विद्युत मोटर जळाल्याने सिरोंजीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथे नागरिकांच्या सोयीकरिता लावण्यात आलेला फिल्टर प्लांटही गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. फिल्टर प्लांट व पाणीपुरवठा ट्यूबवेल बोअरवेलजवळ गाजरगवत वाढले असून, घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
गावकऱ्यांना थंड शुद्ध पाणी मिळावे
म्हणून गावात शासनाच्या निधीतून
फिल्टर प्लांट लावण्यात आला आहे.
पण बिल न भरल्यामुळे फिल्टर प्लांट
बंद आहे. लाखो रुपये खर्च करून
उभारण्यात आलेला फिल्टर प्लांट बंद
असल्यामुळे शासनाच्या लाखो
रुपयांचा चुराडा झाला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष
देऊन त्वरित पाणीपुरवठा नियमित
करण्याची मागणी गावकऱ्यांनी
केली आहे.
(प्रतिनिधि मंगेश उराडे नागपुर जिला)