नागपूर जिल्यातिल सावनेर वरुण काही अंतरावर भदी पिपला येथे समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्या च्या नादात मागे बसलेला दुचाकीस्वार
तोल गेल्याने ट्रकच्या चाकाखाली
आला तर दुचाकी विरुद्ध बाजूला
पडली. यात एकाचे 2 पाय चकना चूर व हात मोडल्याने जागीच मृत्यू झाला
असून, तर दुसरा दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असुन सावनेर पांडुर्णा महामार्गावरील
पिपळा (भदी) फाट्याजवळ रविवारी
(दि. २६) दुपारी अंदाजे ३ ते ४ सुमारास घडली.राजेश बरडे (३७, जवाहर वॉर्ड, पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे मृताचे तर मनोज बारबुवरे (२६, रा. संतोषी माता नगर, पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. दोघेही एमपी-२८झेडसी- ४२५६ क्रमांकाच्या मोटरसायकलने सावनेर हून पांदुर्ण्याला जात होते.

मनोज हा मोटरसायकल चालवित होता तर राजेश मागे बसला होता. पिपळा (भदी), ता. सावनेर फाट्या जवळ मनोजने समोर असलेल्या सीजी-०४/एमजे ७४४८ ला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही वाहने समांतर असताना राजेश तोल गेल्याने ट्रकच्या चाका खाली आला तर मनोज दुचाकीसह बाजूला पडला. यात राजेश गंभीर व मनोज किरकोळ जखमी झाला. माहिती मिळताच पोलिसांसह हितेश भाऊ बन्सोड यांनी घटनास्थळ गाठले व दोघांनाही सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती राजेशला मृत घोषित केले आणि मनोजवर उपचाराला सुरुवात केली. याप्रकरणी केळवद पोलिसांनी गुन्हा नोंदवून दुर्घटनाग्रस्त झालेली दुचाकी जप्त केली ठाणेदार साखरकर यांच्या
मार्गदर्शनात तपास सुरू करीत ट्रक चालक जगदंबा भुतनसिंह (५०,
एमरा. धनारी, ता. जामनिया, जिल्हा
गाजीपूर, उत्तर प्रदेश) यास अटक
केली.

मंगेश उराडे नागपुर जिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *