थांब मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करा रवी राठोड
जिल्ह्यातील आपल्या सर्व महसूल कार्यालयातील कर्मचारी पद स्थापनेपासून आपला कार्यालयीन कालखंड पूर्ण होऊन सुद्धा वर्षानुवर्ष एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या महसुली कर्मचाऱ्यांची बदली अधिनियम 2005 मधील कलम 1(3) नुसार चौकशी करून बदली करा अश्या आशयचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष रवी भाऊ राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व निवासी जिल्हाधिकारी तथा पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यालय नांदेड यांना दिले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालयातील कर्मचारी पदस्थापनेपासून कालखंड पूर्ण होऊन सुद्धा वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली अधिनियम 2005 मधील कलम 1(3) नुसार बदली बंधनकारक असताना देखील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय व सर्व तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी सेवा बजावत असल्यामुळे काही लोकांसोबत हितसंबंधाचे नाते जुळले असून मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तालुका स्तरावरील महसूल कार्यालयात शेतीविषयक कामाबाबत गेले असता अनेक वेळा कामाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना अपमान जनक वर्तणुकीला सामोरे जावे लागत असल्याने जगाच्या पोशिंदालाच जर शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांकडून असे अपमान जनक वर्तणूक मिळत असल्याची जिल्यातील शेतकऱ्यांत ओरड आहे. त्यामुळे जिल्ह्यात कर्मचाराविरुद्ध अनेक वेळा तक्रारी पण झाल्याचे वृत्तपत्रातून व वृत्तवाहिन्या च्या माध्यमातून बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या तसेच महसूल विभागामध्ये मागील अनेक वेळा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई करून जेरबंद करण्यात आले आहे.
तरी वरील प्रकार अत्यंत गंभीर असून मेहरबान साहेबांनी वरील विषयांकित शेतकऱ्यांविषयी महसुली कामाबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून महसूलधारक शेतकऱ्यांना कालखंड पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली करून न्याय द्यावा अश्या आशयचे निवेदन दिले असून या निवेदनावर मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष डॉ. असिफ,शहर सचिव महेश ठाकूर,मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुभाष भंडारे,शहर उपाध्यक्ष जाधव, हदगांव विधानसभा अध्यक्ष बालाजी पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिनिधी सचिन जाधव Ntv news मराठी नांदेड