23 मे रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड यांच्या वतीने भोकर शहरातील पाच नवीन इंटरसेप्टर वाहनांसह रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली.
जिल्ह्यात दरवर्षी किमान 350 ते 400 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यामध्ये प्रामुख्याने भोकर तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. वाहतुकीचे नियम न पाळणे, हेल्मेट व सीट बेल्ट न लावणे, दारू पिऊन वाहन चालवणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे आदी कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
हे थांबवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्यात पाच नवीन इंटरसेप्टर वाहने दाखल झाली असून, आता इंटरसेप्टर वाहनांची संख्या सात झाली आहे.
काळ्या फिल्मने झाकलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी हे वाहन स्पीड गन, श्वास विश्लेषक, टिंट मोटर इत्यादी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी गुरुवारी आठवडी बाजारादरम्यान भोकर शहरातील मुख्य रस्त्यावर लोकांना एकत्र करून मार्गदर्शन केले. यावेळी आरटीओ कार्यालयाचे अधिकारी श्री सतीश भोसले, श्री सुनील जारवाल, संघपाल कदम उपस्थित होते.
प्रतिनिधी,राजेश चंद्र
Ntv न्युज मराठी भोकर