महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन या योजनेच्या माध्यमातुन आता राज्यांतील दुर्बल घटक अबाल परितक्त्या भुमिहिन शेत मजूर आशा पात्र आणि गरजु महिलांना आता दरमहा रुपये पंधराशे शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय तथा अध्यादेश जाहीर करून युती सरकार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या वतीने सर्व सामान्य कुटुब व दुर्बल महिलांना आधार देण्यात आला असल्याने संपूर्ण राज्यभरातून सर्व सामान्य गोर गरीब दुर्बल महिलांना दिलासा मिळाला असून सर्व स्तरातून युती सरकारच्या या निर्णयाचे विविध उपक्रमाने स्वागत होत असतानाच जामखेड तालुक्यातील सामाजिक काम व महिला सबली करणाचे महत्व पुर्ण काम करणाऱ्या तथा माजी मत्री व विद्यमान आमदार राम शिंदे यांच्या विश्वासु समर्थक भारतीय जनता पार्टीच्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीस आणी महिला बचत गटाच्या सि टी सी सौ मनीषा आर्जुन मोहळकर यांनी शासनाच्या या महत्वपुर्ण निर्णयाचे स्वागत करत आणि प्रा तथा माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील नान्नज येथे शेकडो महिला सोबत जल्लोष करत पेढे वाटून शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले
या योजनेतुन लाभ मिळवण्या साठी शासनाच्या वतीने लवकरच एक विशेष पोर्टलची सुरवात करण्यात येणार असून या साठी आधार कार्ड उत्पनाचे प्रमाण पत्र बॅक पासबुक लाभार्थीचा मोबाईल क्रमांक आणि योजनेसाठी वय मर्यादा हि 21 ते 60 वर्ष वयाची असुन घटस्पोटीत अबला परितक्त्या निराधार तथा विवाहीत परंतु अटी पुर्तता करणाऱ्या महिला आणि सदर महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 म्हणजे अडिच लाखाच्या आत असावे असे शासन निर्णयातून स्पष्ट करण्यात आले असल्याची माहिती सौ मनिषा मोहळकर याच्या वतीने उपस्थित महिलांना देण्यात आली असून गरजु व योग्य लाभार्थीने संपर्क करावा असे आव्हाहन करण्यात आले आहे
नंदु परदेशी
अहमदनगर जिल्ह प्रतिनिधी
मो न 9765886124