section and everything up until
* * @package Newsup */?> पंधरा दिवसांत मिळणार हक्काचा भूसंपादनाचा मोबदला | Ntv News Marathi

आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा, शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे

कर्जत ता.4 – शेतकरी संघटनेचे आंदोलन आणि आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा याला यश आले असून पुढील १५ दिवसात कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा भूसंपादनाचा हक्काचा मोबदला मिळणार आहे. तसे आश्वासन कुक़डी सिंचन मंडळाच्या अधीक्षकांनी दिल्याने शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु करण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या जमिनीची हक्काची रक्कम जमा होणार आहे.

कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी १९८२ साली कर्जत तालुक्यातील मौजे रुईगव्हाण, कोपर्डी, कुळधरण आणि शिंदे या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनीचे भूसंपादन करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीचे वाढीव दावे मंजूर होऊनही त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला नव्हता. भूसंपादन अधिकारी, कुकडी बांधकाम विभाग यांना शेतकरी संघटनेचे नेते लालासाहेब सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वारंवार निवेदने दिली, पाठपुरावा केला, आंदोलने केली मात्र सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. श्रीगोंदा न्यायालयानेही २०१२ साली याबाबत निर्णय देऊन शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. मात्र जलसंपदा विभाग याबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने अखेर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३ जुलैपासून कुकडी सिंचन मंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते.
आमदार रोहित पवार यांनीही निवडणुकीमध्ये भूसंपदनाचा मोबदला मिळवून देण्याचा शब्द दिला होता आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन आतापर्यंत १०९ कोटी रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचा मोबदला मिळवून दिला आहे. या उपोषणप्रश्नीही आमदार रोहित पवार यांनीही प्रशासनाशी संवाद साधून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अखेर कुकडी सिंचन मंडळ अधीक्षकांनी पुढील १५ दिवसात शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे लवकरच अनेक दिवसांपासून रखडलेला जमिनीचा हक्काचा मोबदला या शेतकऱ्यांना मिळणार आहे. लोक्रपतिनिधींच्या प्रयत्नांना सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची साथ मिळाली तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही, हेच या निर्णयातून दिसते.

‘‘कुकडी कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला २५-३० वर्षे मिळत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे. हक्काच्या मोबदल्यासाठी मागणी करुनही शेतकऱ्यांची एक पिढी यामध्ये गेली तरी सरकारला जाग नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकांचं म्हणणं ऐकलं जात होतं, म्हणूनच माझ्या पाठपुराव्याने १०९ कोटी रुपये मोबदला मिळवून देता आला. पण हे सरकार ढिम्म असून केवळ निधी नसल्याचाच पाढा ऐकवत आहे. पण शेतकऱ्यांनी जो लढा दिला त्याचं मी स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो!’’

रोहित पवार
(आमदार कर्जत -जामखेड विधानसभा)

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहमद नगर
मो न 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *