नियमबाह्य विद्यार्थी वाहतुक केल्यास होणार कारवाई,पोलिस विभाग अलर्ट
वाशिम:-वाशिम जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस.या शासकीय कामासाठी जात असतांना मंगरुळपीर शहरातुन विद्यार्थांची प्रवाशी वाहतुक बेकायदेशीररित्या सुरु असल्याचे दिसले.क्षमतेपेक्षा जास्त आॅटोमध्ये विद्यार्थ्यांना कोंबुन बसवले होते तसेच विद्यार्थ्यांचे दप्तरेही बाहेर लटकवलेले होते.अशा पध्दतीच्या वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतु शकते त्यामुळे तात्काळ सदर आॅटोचालकांना ताब्यात घेवुन कारवाईसाठी मंगरुळपीर पो.स्टे.ला सुचित केले.येथील ठाणेदार यांनी कारवाई करत इतरही आॅटोचालकांची बैठक घेवुन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सर्वांना सुचना दिल्या.दि.२० जुलै रोजी मंगरुळपीर येथील प्रत्येक शाळेत पोलिस तैनात होते तर आरटिओ पथकही शहरात ठाण मांडुन बसले होते.वाहतुकीचे नियम मोडणारांवर यापुढे गैर केल्या जाणार नसल्याने आॅटोचालकात घबराहट निर्माण झाली असुन आज शाळेत विद्यार्थीच आणले नसल्याने शाळेत खुप कमी विद्यार्थी दिसले
वाशिम जिल्ह्यात व मंगरुळपीर येथे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन व चालक यांची पात्रता पाहिली, तर कोणालाच ही वाहतूक करण्याचा परवाना मिळू शकणार नाही, अशी स्थिती आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या वाहनांतून विद्यार्थी संख्येची क्षमता महाराष्ट्र मोटार वाहन नियम 106 नुसार 12 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना 2 आसन क्षमता असणार्या सीटवर 3 विद्यार्थी व तीन आसन क्षमता असणार्या वाहनात चार विद्यार्थी इतकीच आहे. प्रत्यक्षात रिक्षात 12 ते 15 विद्यार्थी कोंबले जात आहेत. वर्षानुवर्षे ही वाहतूक कशी सुरू राहते, हा मोठा प्रश्न आहे.रिक्षाचालकांची मनमानी वाढत आहे, पण मुलांना शाळेत जाण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. मुलांच्या शाळेच्या वेळेत शहरबस उपलब्ध नसते. शिवाय वेळही निश्चित नसतो. मुलांना नाइलाजास्तव रिक्षानेच शाळेत जावे लागते.
नियम पालनासाठी पालकांची साथ हवी
नियमानुसार वाहतूक झाली, तर प्रवासखर्चात महिन्याला 180 ते 200 रुपये वाढ होईल. त्यासाठी आपल्या मुलांच्या सुरक्षेबद्दल तडजोड करायची का? पालकांनी नियम जाणून घेऊन ते लागू करण्यासाठी प्रशासनाला साथ द्यायला हवी.
वाहन चालवतानाची काळजी
वाहनाचा आरसा सुस्थितीत करावा.
सीटबेल्ट/हेल्मेट परिधान करावे.
योग्य इशारा करूनच वाहन रस्त्यावर आणावे.चौक पार करताना वेगावर नियंत्रण योग्य मार्गिकेची निवड
समोरील वाहनांना प्राधान्य
थांबा, पाहा व नंतरच पुढे जाणे आवश्यक
वाहनात प्रथमोपचार पेटी व पाच किलोचे एबीसी प्रकारचे 2 अग्निशामक यंत्र बसवावे.वाहनास स्पीड गव्हर्नर बसवणे बंधनकारक.शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या एकाही नियमाचे सध्या वाशिम जिल्ह्यात तसेच मंगरुळपीर शहरात पालन होत नसल्याचे उघड झाले आहे. रिक्षाचालकांविरोधातील कारवाईची मोहीम पुन्हा थंडावली आहे. त्यामुळे अडलेले पालक व विद्यार्थ्यांना रिक्षाचालकांच्या अरेरावीला सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. पालकांची लूट करणार्या व विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणार्या रिक्षाचालकांवर सातत्याने कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे. तसे झाले तरच विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकतील.
रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे
मुलाला शाळेत सोडणे प्रत्येक पालकाला शक्य होत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांवर भरवसा ठेवावा लागतो. एका रिक्षात अनेक मुले कोंबलेली असतात. प्रत्येक रिक्षाचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे पालकांकडुन सांगण्यात आले.
वाहतुकीचे नियम मोडणारांची आता खैर नाही
यापुढे कुण्याही आॅटोचालकाने विशेषतः विद्यार्थी ने आन करणार्या वाहनाने वाहतुकीचे नियम मोडल्यास किंवा क्षमतेपेक्षा जास्त मुळे वाहनात बसवल्यास कठोर कारवाई होणार आहे.वाशिम जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थी वाहनांविषयी संवेदनशिलतेने घेवुन यापुढे गैर न करता नियम धाब्यावर बसवणार्या आॅटोचालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.दि.२० जुलै रोजी मंगरुळपीर येथील प्रत्येक शाळेत पोलीस तैनात करण्यात आले होते.आता विद्यार्थी वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.आरटिओ पथकही मंगरुळपीरमध्ये ठाण मांडुन होते त्यामुळे नियम मोडणारांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.आॅटोचालकांनी कारवाई होईल या भितिने विद्यार्थीक शाळेत नेले असल्याने मुलांना शाळेत जाताच आले नाही.
खेड्यातुन एसटी बस फेर्या सुरु करण्याची होत आहे मागणी