गब्बर आ रहा है:होणार प्रशासनावर प्रहार
सचिन बिद्री:उमरगा
सोमवार दि 29 जुलै रोजी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सकाळी ठीक 11 वाजता उमरगा तालुक्यात आगमन होणार आहे.
बच्चू भाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्या स्वेच्छा सेवा निवृत्ती निमित्ताने आयोजित शहरातील शांताई मंगल कार्यालयात सत्कार कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.दुपारी दोन च्या जवळपास त्यांचा पुढील प्रवास लातूर च्या दिशेने लामजना मार्गे होणार असून देवनी येथील भव्य शेतकरी मेळाव्यास त्यांची उपस्थिती असणार आहे.नंतर देवनी येथून जळकोट मार्गे नांदेडकडे त्यांनतर नांदेड येथून सायंकाळी 7 च्या जवळपास परभणी मार्गे अमरावती असा प्रवास असणार आहे.
उमरगा शहरात पहिल्यांदाच बच्चू कडू यांचे आगमन होत असून तालुक्यातील ढिसाळ प्रशासनव्यवस्था व वाढते गुंड प्रवृत्ती, चोऱ्या, लूटमार,बोकाळलेले अवैध धंदे यामुळे शालेय मुली आणि पालक वर्गात निर्माण झालेली भिती या अश्या विविध विषयावर बच्चू कडू प्रशासकीय अधिकाऱ्यांची शाळा घेणार आणि प्रशासनावर होणार प्रहार अशी अपेक्षा तालुका व परिसरातील दिव्यांग,शेतकरी,विद्यार्थिनी सर्व पालक आणि सुजाण नागरिकांतुन व्यक्त होत आहे.