जिल्हा कर्मचारी संघटना व मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन
श्री 108 सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान आळंद,
श्री 108 डॉ शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा आणि लोहारा तालुक्यातील श्री 108 अभिनव सूतरेश्वर महास्वामी हिरेमठ संस्थान अचलेर यांच्या दिव्य सानिध्यात आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्या स्वीच्छा सेवानिवृत्ती बद्दल भव्य सत्कार सोहळा दि 29 रोजी शहरातील शांताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या भव्य सोहळ्यात सोलापूरचे माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार,धाराशिव जि प माजी अध्यक्षा गोदावरी केंद्रे, जि प कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती ऍड दिपक अलुरे,भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य,धाराशिव युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे,प्रहार पक्ष जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे, प्रहार दिव्यांग संघटनेचे मयूर काकडे,भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी चालूक्य,संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार,मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तुषार पाटील,जि प माजी सदस्य शरण पाटील,आय एम ए अध्यक्ष डॉ अनंत मुगळे,उमरगा बार कौन्सील अध्यक्ष ऍड गोविंद गायकवाड,मुस्लिम जमात कमिटीचे बाबा औटी, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार,वीरशैव सभा जिल्हाध्यक्ष प्रफुलकुमार शेटे,लोहारा माजी नगराध्यक्ष दिपक मुळे,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार,तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार,गोविंद पवार माजी बांधकाम सभापती जि प धाराशिव, कम्युनिस्ट नेते अरुण रेनके, पोलीस पाटील संघटना तालुकाध्यक्ष महेशंकर पाटील, विजय बोरसे, विजय काका जाधव, हरीश डावरे, रामचंद्र आलूरे, शिवराज पाटील, सुनील साळुंके, सुरेश हरीशचंद्र पवार, शकुंतला मोरे, बालाजी यादव, संतेश्वर ढोबळे,तानाजी मोटे,ऍड सय्याजी शिंदे,अमर वाले,सामाजिक कार्यकर्ते ऍड शितल चव्हाण, महंतय्या स्वामी, संजय गिराम आदिसंह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मचारी संघटनेचे उमाकांत सूर्यवंशी, उत्तम मगर, लिंबराज साठे, विलास कांटेकुरे, प्रदीप जाधव, रामदास जगताप, गिरीश दाभाडकर, शरद मुंडे,नितीन पाटील, महादेव जगताप, विकास जाधव, संजय वाघमारे, मल्हारी कदम प्रविण इंगळे, स्वप्नील हावले, अंकुश शिंदे, मारुती गायकवाड, लिंबराज साठे आदींचा विशेष पुढाकार असणार आहे.
या सोहळ्यात उमरगा लोहारा तालुक्यातील शेकडोच्या संख्येने दिव्यांग बंधू भगिनीं, शेतकरी, मजूर, कामगार, कर्मचारी वर्ग उपस्थित असणार आहेत.