: सध्या पावसाळ्याचे दिवस
असल्याने अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुल्ल झाली आहे. रिमझिम पाऊस अन त्यात पसरलेली हिरवाई यामुळे मंत्रमुग्ध होत आहे. परिसरातील धावडा
गोदरी रोडवर धावडा गाव पासून आठ किलोमीटरच्या अंतरावर
डोंगराळ भागात तर सध्या नयनरम्य दृश्य बघायला मिळते आहे. आता यामध्ये अजून एका महत्त्वाच्या पर्यटन स्थळाची भर पडली असून धावडा जवळ गोद्री रस्त्यावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणाची चोहोबाजूंनी हिरवेगार जंगल अन डोंगराच्या पायथ्याशी असलेला ढोलकी धबधबा डोळ्यांचे पारणे फेडतो आहे. उंचावरून कोसळणारा धबधबा, ओढ्याने वाहणारे स्वच्छ पाणी, घनदाट हिरवेगार जंगल, हिरवाईने नटलेले झाडे झुडुपे, पक्षांचा मधुर आवाज सर्व नजारा बघून मन अगदी तृप्त होऊन निसर्गाच्या सानिध्यात तासनतास रमून जावे वाटते. या ठिकाणी सर्वांनी एकदा आवर्जून जावेच.
प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन जालना