दोन दिवसांपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे यामध्ये लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी csc सेंटरवर नागरिकांची गर्दी होतांना दिसत आहे त्यातच कुठलेही ऑनलाईन कागदपत्रे काढायचे असेल तर फक्त 25 ते 35 रुपये ऑनलाईन फीस लागते परंतु अंबड शहरातील csc सेंटर वाल्यांची मनमानी चांगलीच वाढलेली पहावयास मिळत आहे कुठलाही ऑनलाईन पेपर काढायला 200 ते 300 रुपये घेतले जात आहेत यावर प्रशासनाने कारवाई करने गरजेचे आहे परंतु प्रशासन मात्र झोपेच सोंग घेतांना दिसत आहे तसेच लाडकी बहीण योजनासाठी काही मध्यस्ती देखील तयार झालेले दिसत आहे 1000/2000 रुपये द्या घेऊन फाईल करुन देतो अशा पद्धतीने देखील नागरिकांना लुटण्याचा प्रकार अंबड शहरात सुरु आहे प्रशासन कारवाई करणार का याकडे सर्व जनतेचं लक्ष लागले आहे
न्युज रिपोर्टर :- अशोक खरात
अंबड जि जालना
मो नं 9822161631