एका कारच्या धडकेत बापाचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोटर सायकल वर जात असलेले बाप लेक महामार्ग ओलांडत असताना त्यांना भरधाव वेघाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली आणि या भीषण अपघातात बापाचा जागेच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

रघुनाथ जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा श्रीकांत जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्याला आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. मयत रघुनाथ जाधव यांना कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.

मयत रघुनाथ जाधव हे आपल्या मोटर सायकलवर रस्ता ओलांडत असताना कार चालक शशांक शिंगारे हे पुण्याहून नाशिककडे भरधाव वेगात जात असताना हा भीषण अपघात झालाय. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांचा पोलीस पाऊस फाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला तर घारगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.