महाराष्ट्र शासन गृह विभागाने नुकत्याच काढलेल्या आदेशान्वये पोलीस अधीक्षक ते पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, (भा. पो. से.) यांची बदली पोलीस उप-आयुक्त म्हणून पुणे शहर येथे झाली असून त्यांचे ठिकाणी पोलीस अधीक्षक गोंदिया पदी, नागपुर परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त गोरख सुरेश भामरे, (भा. पो. से.) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
गोरख सुरेश भामरे, (भा. पो. से.) यांनी पोलीस अधीक्षक, गोंदिया पदाचा पदभार निखिल पिंगळे यांच्याकडून आज रोजी स्वीकारलेला आहे.
राधाकिसन चुटे , प्रतिनिधी गोंदिया.