जेसीबीच्या कामाचे २ हजार रुपये मागितल्याचा राग येऊन मुंगूसगाव येथील सुमारे १२ जणांनी विसापूर (ता.श्रीगोंदा) येथील तिघांना शिवीगाळ करत लाकडी काठीने तसेच कोयत्याने बेदम मारहाण करत गंभीर जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेत सुजित मोरे श्रीनाथ गाढवे, सागर मदने (रा.विसापूर, ता. श्रीगोंदा) हे जखमी झाले.या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात प्रथमेश शिवाजी जगताप (वय २४, रा.विसापूर, ता. श्रीगोंदा) याच्या फिर्यादीवरून सुचित इथापे, स्वप्निल कानगुडे, शिवम टकले, राहुल भोसले, सचिन धुमाळ, अनिकेत कानगुडे, अनिकेत गुडेकर, इंद्रजीत कर्डिले, वैभव टकले, मयूर कानगुडे, अक्षय इथापे, दीपक बोरुडे (सर्व रा. मुंगूसगाव, ता. श्रीगोंदा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
