मराठा आरक्षणाचे नेते म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर शहरातून काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीचे पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आले आहे. रॅलीचा रोड मॅप तयार करण्यात आला असून तब्बल ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी फाटा येथून म्हणून जरांगे पाटील यांचे नगर जिल्ह्यात आगमन होणार आहे. तिथून ते केडगाव येथे येणार आहे. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅलीसाठी मराठा स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शांतता रॅली ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांकडून वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. गरज पडल्यास शहरात येणारी वाहतूक कायनेटिक चौकातून वळवण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.
