दिल्ली गाजविणारे जेष्ठ पत्रकार अशोक वानखडे मूळ आर्णी चे भूमिपुत्र

दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार स्तंभलेखक भारतातील निष्पक्षता पूर्ण मांडणी करणारे प्रसिद्ध राजकीय विश्लेषण अशोक वानखडे जे टायगर या नावाने देशात सुप्रसिद्ध आहेत, त्यांचे जाहीर व्याख्यान आर्णी शहरात 25 ऑगस्ट रविवारला सायंकाळी सहा वाजता आयोजित केले आहे. आर्णी ते यवतमाळ मार्गावरील श्रद्धेय उत्तमराव दादा पाटील मार्केट यार्ड पाण्याच्या टाकीजवळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. जाहीर व्याख्यानाचा विषय “निवडणुका कोणासाठी जनतेसाठी की नेत्यांसाठी” हा असून या विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य करण्यासाठी अशोकराव वानखडे आर्णी शहरात रविवारी येत आहे. विशेष म्हणजे दिल्ली गाजवणारे जेष्ठ पत्रकार अशोक वाणखडे हे मूळ आर्णीचे भूमिपुत्र आहे. आर्णी येथील संघटना “निर्भय बनो” या संघटनेने सदर अभ्यासपूर्ण जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.
स्पष्ट परखड तितकेच खुमासदार शैलीतील अभ्यासपूर्ण जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रफीक सरकार आर्णी यवतमाळ