धर्माबाद (माधव हानमंते) येथून नांदेडला क्लासेस ला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून नांदेड रेल्वे पोलीस चौकी मध्ये रेल्वे टीटीई विरुद्ध पी. एन. सी. कलम 352 बी.
एन. एस. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की धर्माबाद येथील एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी आपल्या भावासह ट्रेन नंबर 17641 काचीगुडा – नरखेड या ट्रेनने नांदेड येथे जात होती ट्रेन स्टेशन मध्ये आलेली होती त्यामुळे जनरल तिकीट घेऊन घाईघाईने ते डी १ या कोच मध्ये चढले व दारातच थांबले होते. ट्रेन काही अंतर पुढे गेल्यावर सदर कोच मध्ये टीटीई आला. त्याने तिकीट दाखवन्यास सांगितले तेव्हा विद्यार्थिनीने तिचे व तिच्या भावाचे तिकीट दाखवले त्यावर सदर टीटीई चिडून विद्यार्थिनीवर रागावत ये रिझर्वेशन कोच है इसमे तुम बैठ नही सकते इतनी भी अकल नही है क्या असे म्हणून 660 रुपये जुर्माना भरणा पडेगा म्हणत व वडील काय करतात असे विचारणा केली असता सदर विद्यार्थिनीने माझे वडील पत्रकार आहेत असे सांगितले तर तो जास्तच भडकला व अब तो 1000 रुपये जुर्माना भरणा पडेगा असे म्हणू लागला त्यामुळे विद्यार्थिनीने आपल्या वडिलांना फोन लावून ही घटना सांगत असताना ट्रेन उमरी स्टेशन जवळ पोहोचली होती. तेव्हा टीटीई ने रागावत तुम्हारी औकात क्या है, शेमलेश असे हिंदीत व इंग्रजीत शिवीगाळ करीत विद्यार्थिनीची बॅग चालत्या ट्रेन मधून बाहेर फेकली त्यामुळे घाबरून विद्यार्थिनी व तिचा भाऊ चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करीत असताना दोघेही खाली पडले त्यांना किरकोळ जखमा झाल्या. सदर विद्यार्थिनींनी उमरी रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गेली असता तिला नांदेड येथील पोलीस चौकी तक्रार देण्यास सांगितले तोपर्यंत इंटरसिटी उमरीहुन निघाली होती. त्यामुळे उमरीहून निजामाबाद पंढरपुर ट्रेनने सदरील विद्यार्थिनी व तिचा भाऊ नांदेड येथे रेल्वे पोलिसात लेखी तक्रार दाखल केल्यावरून विद्यार्थिनीशी उद्धट व गैरवर्तन करणाऱ्या टीटीई विरोधात एन सी पी एन सी कलम 352 बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक एच. जी.पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. का. मेलपेदवार हे पुढील तपास करीत आहेत.

चौकट
रेल्वे विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवाशा सोबत होणारे गैरवर्तनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यांची मुजोरी प्रवाशासाठी त्रासदायक ठरत आहे. स्टेशन मास्टर अथवा तिकीट देणारा कर्मचारी हे प्रवाशाला कधीही व्यवस्थित अथवा सामंजस्याने बोलत नाहीत अरेरावी व धमकीचीच भाषा वापरत असतात. रेल्वे परिसरात आमचे कोणीच काही करू शकत नाही असा अविर्भाव त्यांच्या अंगात असतो या वृत्तीस लगाम लागला पाहिजे यासाठी रेल्वे बोर्डाचे सदस्य तथा माजी उपनगराध्यक्ष सखाराम निलावार यांनी डी.आर.एम. (हैदराबाद डिव्हिजन) यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *