सायकल बँकेला शिरीष कडगंचेतर्फे नवी सायकल भेट..!

सचिन बिद्री:उमरगा

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेने मुलींच्या शिक्षनात कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे नेहमी धडपडीत असतात. गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तत्परतेने सोडवण्यासाठी शहरातील उद्योजक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने सोडवाण्यासाठी प्रयत्नशील असतात.
अशा या नानाविध उपक्रमापैकीच एक सर्वात हटके उपक्रम म्हणजे “सायकल बँक” याअंतर्गत शाळेचे माजी विद्यार्थी, शहरातील व्यवसायिक,व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्याघरात असलेल्या सायकली ज्या वापरात नाहीत पण उत्तम कंडिशन मध्ये आहेत त्यांनी त्या या बँकेत जमा करू शकतात..!या बँकेतील सायकली शाळेतील गरजू तथा शाळेपासून दूर घर असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शाळेतर्फे देण्यात येते. यामुळे संबंधित विद्यार्थि अगदी वेळेवर किंबहुना वेळेच्या काही मिनिट आधीच शाळेत उपस्थित राहू शकतात आणि शाळेला येण्याची गोडी तथा शिक्षणाची आवड निर्माण होताना दिसून येत आहे.
जि प शाळेचे माजी विद्यार्थी शिरीष कडगंचे यांनी दि 31 ऑगस्ट रोजी या बँकेत नवीन सायकल भेट स्वरूपात देत या विधायक उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांचे कौतुक केले.
यावेळी शाळेतील शिक्षक धनराज तेलंग, संजय रुपाजी, विद्यानंद सुत्रावे, सोनाली मुसळे, ममता गायकवाड, शिल्पा चंदनशिवे आदी उपस्थित होते.
या सायकल बँकेत आत्तापर्यंत चौदा सायकल जमा झालेले आहेत, यापुढेही अनेक पालकांनी संपर्क करून सायकल शाळेला भेट देण्याची इच्छा व्यक्त केलेली असून सायकल बँक अतिशय चांगला उपक्रम आहे.या उपक्रमामुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी उपयोग होत आहे.शाळेत येण्या-जाण्यासाठी उत्तम सोय होत आहे.यामुळे वेळेची, पैशाची आणि मानसिक त्रासापासूनऊ मुलींना संरक्षण मिळणार आहे मुलींना शिक्षणात गोडी निर्माण होऊन मुली शिक्षणाकडे वळतील आणि दहावीपर्यंतची शिक्षण पूर्ण करून भविष्यात स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतील. यामुळे शिक्षणातील मुलींचे गळतीचे प्रमाण थांबून मुली शिक्षण प्रवाह येतील.उमरगा शहर व परिसरातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात मोठ्या मनाने व सढळ हाताने मदत करावे अशी माहिती यावेळी मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी देत आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *