विनोद गोडबोले नागपूर

🛑खापरखेडा २१० मे वॉट विज केंद्रातील भेल यार्ड येथे सोमवार २ सेप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते १२ या क पाळीत सी डी एस एस कंपनीचा सुरक्षा रक्षक अजय भोयर हा कर्तव्यावर असतांनी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास अचानक सुरक्षा रक्षकाच्या गुमठी जवळ त्याच्या दुचाकी वाघ दिसल्याने अजय घाबरून गेला परंतु समयसूचकते मुळे अजय हा वनराईतुन जोरात धावत गेला जवळच असलेल्या डी पाईन्ट येथे दुसऱ्या सुरक्षा रक्षकाची गुमठी आहे तिथे लपला त्यामुळे अजय थोडक्यात बचावला लगेच अजयने सुरक्षा अधिकारी यांना घटने बाबत मोबाईलने कळविले त्वरित विज केंद्राचे सर्व सुरक्षा अधिकारी घटना स्थळी पोहचले याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहीती देण्यात आली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळ गाठुन वाघाच्या पायाच्या ठस्यावरुन ओळख केली की हा वाघच आहे याबाबत समाजमाद्यमा द्वारे वाघाच्या पायाच्या ठस्याचे वीडियो वायरल झाल्यामुळे कामगार वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोणातुन सुरक्षा विभाग तर्फे कामगारांना सतर्क राहण्याचे आव्हान केले होते.

🛑रोहणा येथील वाघाच्या हल्ल्यात गाय व वासराचा मृत्यु खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील रोहणा येथे ४ सेप्टेंबर बुधवार रोजी सकाळी रविंद्र खापरे कन्हान नदी काठावर शेत असून सकाळी ७ च्या बैलाला चरण्यासाठी सोडले आणि गोठयात गाई आणि वासरू होते सकाळी ९ च्या सुमारास वाघाने गाईवर हल्ला केला आणि तिला गंभीर जख्मी केले परंतु गाईला खाने न जमल्याने जवळच असलेल्या वासराला लक्ष करून शेता जवळच असलेल्या सिताफळाच्या वनात घेऊन खात होता जेव्हा रविंद्र हा गाईच्या गोठया कडे गेला असता गाय गंभीर जख्मी अवस्थेत दिसली पण वासरू दिसले नाही त्यावर रविंद्रला संशय आला आणि गावकर्यांना बोलविले ५०,६० लोक आले आणि सिताफळाच्या वनाकडे गेले तेव्हा वाघ हा वासराला खान्याच्या प्रयत्न करीत होता लोकांनी जोरजोरात आरडा ओरोड केली त्यामुळे वाघने वासराला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला परंतु वासरू प्राण वाचू शकले नाही आणि उपचाऱ्या दरम्यान गाईचा मृत्यु झाला यावेळी वनविभागाचे अधिकारी व खापरखेडा पोलीस निरीक्षक अरविंकुमार कतलाम सह पोलीस पथक सरपंच चंद्रशेखर लांडे वन्यजीव मित्र दाद्दु गणवीर घटना स्थळा दाखल झाले होते यावेळी वनविभागाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करुन जेरबंद करावे व रविंद्र खापरे यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपा महामंत्री सावनेर तालुका व विध्यमान रोहण्याचे सरपंच चंद्रशेखर लांडे व भाजपाचे किसान विकास आघाडीचे राजेश(बळी) गायकवाड सह गावकर्यांनी केली.