🛑बॅरि.शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा येथे सांस्कृतिक विभागातर्फे शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.राजेंद्र राऊत यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यकर्तृत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली व शिक्षकांप्रती असलेला आदर व्यक्त करत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. टाले होते .विद्यार्थी या देशाचे भविष्य घडविणारा आहे व त्याला घडविण्यासाठी शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो असे मत त्यांनी व्यक्त केले .शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी एक दिवसीय प्राचार्य व प्राध्यापक बनण्याचा आनंद घेतला .बी.ए.भाग-१ ची विद्यार्थीनी कु. ज्ञानेश्वरी गोठवाड हिने एक दिवसीय प्राचार्य पद भूषविले. बी .कॉम.भाग -२ ची विद्यार्थिनी कु .प्रणाली ठाकरे हिने उपप्रचार्याचे पद भूषविले कु. सुहानी बोरकर, सुहानी रंगारी, दिव्या रंगारी, फाल्गुनी वाजुरकर, पुनित उपथळे ,जयेश पाटील, प्रणय गजभिये, रितिका जमूने, साक्षी जुनघरे ,या विद्यार्थ्यांनी एक दिवसीय प्राध्यापक बनण्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांच्या तासिका घेतल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाचे समस्त प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.प्रणाली गोठवाड हिने केले सूत्रसंचालन हर्षदा महल्लेनी केले तर आभार कृतिका रहाटे हिने व्यक्त केले