औरंगाबाद : ग्रामपंचायत तिसगावच्या वतीने प्रा.आ.केंद्र दौलताबाद अंतर्गत सिडको वाळूजमहानगर तसेच तिसगाव परिसरातील, जि. प. शाळा तिसगाव, राजस्वप्नपुर्ती, जि.प. प्रा. शाळा म्हाडा काॅलनी, मालपाणी बात्रा, त्रिमूर्ती सोसायटी गट नंबर १७०, सारा ईलाईट, साक्षीनगरी, यश फार्मा इन्स्टिट्यूट, रोझ बर्ड इंग्लिश स्कुल, पियुश विहार आशा विविध ठिकाणी लसीकरण कॅम्पचे आयोजन करून काॅलनीतील जास्तीत जास्त लसीकरण करून घेतले.
आतापर्यंत जवळपास ७० % पुर्ण झाले आहे. आता ग्रामपंचायत तिसगावच्या कायमस्वरूपी लसिकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती त्यानुसार आजपासून नियमित लसीकरण सुरु राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कायमस्वरूपी लसिकरण कॅम्पची सुरूवात अतिरिक्त जिल्हा अरोग्य आधिकारी डाॅ. अभय धानोरकर, वैद्यकीय आधिकारी डाॅ. जितेंद्र मंडावरे, वैद्यकीय आधिकारी डाॅ. पुष्पलता सावंत, तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे ,राजेश कसुरे, प्रविण हांडे, संजय जाधव, निर्मला बुट्टे, ग्रामविकास आधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज .