औरंगाबाद : लासुर स्टेशन येथील माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य गणेश व्यवहारे हे दरवर्षी आपला वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करतात. मागील वर्षी त्यांनी वाढदिवसानिमित्त पाच लक्ष रुपयांची रुग्णवाहिका जनसेवेस लोकार्पण केली.काही दिवसांपूर्वी तंदूर हॉटेल येथे काम करणारा कामगार सोमनाथ वनदेव मोरे वय ३३ वर्षे यांचे मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने अकस्मात निधन झाले.या तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.त्याच्या पश्चात आई,पत्नी,भाऊ व दोन मुली असा मोठा परिवार आहे.गणेश व्यवहारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या कुटुंबास अकरा हजार रुपयांची मदत केली. तसेच मृताच्या दोन्ही मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.तसेच प्राथमीक आरोग्य केंद्र लासुर स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरु आहे.

लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या पॅरासीटामल गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला होता.हि बाब व्यवहारे यांना लक्षात येताच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक प्रितमकुमार मुथा यांच्या हस्ते विस हजार पॅरासीटामल गोळ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपीचंद चाटे यांच्याकडे सुपूर्द केल्या. यासोबतच व्यवहारे यांनी ११ गरजवंत लोकांचे वीज मीटर कोटेशन रक्कम स्वतः भरून सहकार्य केले तर बालाजी आरती मंडळ व श्री गणेश संस्थान यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीसाठी २१ हजार रुपयांचा निधी दिला.तर आस्था रुग्णालय येथील अर्धांगवायूच्या उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत टिफिन सेवा सुरू करण्यात येणार आहे.या टिफिन सेवेत रुग्णांना सात्त्विक पद्धतीचे जेवण पुरवणार असल्याचे व्यवहारे यांनी सांगितले. व्यवहारे यांच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत मा उपसरपंच सुरेश जाधव ,सदस्य , राजाभाऊ गायकवाड,नारायण ठोळे,नितीन कांजूने, अमोल शिरसाठ,मयूर जयस्वाल, प्रकाश कोकरे , भगवान गाढे,प्रा.अशोक म्हस्के,प्रा.शशीकांत सांगविकर,प्रशांत दाभाडे, नारायण वाकळे ,कल्याण पवार ,विजय खरोटे ,अविनाश सगेकर , भिकन हाडके,दिनेश व्यवहारे,बाबासाहेब कऱ्हाळे, विनोद बनकर ,योगेश व्यवहारे,मनोज सोनवणे,विजय खरोटे,वाल्मीक बळी,गणेश मिसाळ ,रउफ शेख ,अनिल मोरे ,निलेश व्यवहारे ,सचिन गुजकर, मंगेश राऊत ,पवन भंडारी ,विजय सरोवर, अशोक वाघचोरे ,आदींची उपस्थिती होती.
प्रतिनिधी : रमेश नेटके
गंगापुर औरंगाबाद