
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील पिंपळवाडी गावाला लागुन काही अंतरावर दिनांक 11 / 11 / 2021 रोजी 11 वाजण्याच्या दरम्यान गिरडा घाट उतरनार एक पल्सर मोटर सायकल चा अपघात होऊन दोन व्येक्ती रोड च्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते या वेळी सोयगाव तालुक्यातील नांदातांडा येथील विनोद चव्हाण आणि त्याचा मित्र गिरडा घाट मार्गे बुलढाणा येथे जात असताना त्यांना रोडच्या बाजुला एक पल्सर मोटर सायकल पडलेली आढळुन आली तेव्हा त्यांनी रोड च्या कडेला बघीतले असताना तेव्हा दोन व्येक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळुन आले

दरम्यान विनोद चव्हाण आणि त्याच्या मित्राने त्या व्यक्तींना उचलुन पाणी पाजले हे व्यक्ती सुरंगळी येथील रहिवासी असुन अपघात झालेल्या व्यक्तींचे नाव दिपक सदाशिव गवळी वय 50 , आणि दुसरी व्यक्ती रामदास दगडु गवळी वय 70 दोन्ही राहनार सुरंगळी तालुका भोकरदन जिल्हा जालना असे त्या अपघात झालेल्या व्यक्तींची नावे विचारले असताना त्यांनी अशी माहिती दिली ज्या पल्सर मोटर सायकल चा अपघात झाला त्या मोटर सायकल चा क्रमांक M. H. 11 BM 0865 आहे अपघात झालेल्या व्यक्तींना हाथाला पायाला आणि डोक्याला मुक्का मार लागलेला होता या व्यक्तींना विचारले असता त्यांनी असे सांगितले सावळदबारा येथे काम होतं आणि काही कामानिमीत्ताने हे व्यक्ती सावळदबारा येथे जानार असल्याचे त्यांनी सांगितले विनोद चव्हाण आणि त्याच्या मित्राने त्यांना उचलुन पाणी पाजुन सावळदबारा जाण्यासाठी रवाना करण्यात आले होते
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद