औरंगाबाद : सिल्लोड मधुन प्रकाशित होणारे साप्ताहिक”आपले ज्ञानपंख” या वृत्तपत्राच्या दिवाळी विशेषांकाचे सिल्लोडचे तहसिलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते तहसिल कार्यालयाच्या सभागृहात प्रकाशन करण्यात आले.
त्यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत यांनी साप्ताहिक “आपले ज्ञानपंख” वृत्तपत्रांतील बातम्या ह्या नेहमीच निर्भिड असतात तसेच हे वृत्तपत्र अन्यायाला वाचा फोडणारे असून भविष्यात हे साप्ताहिक नक्कीच दैनिक होऊन महाराष्ट्रात च नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण वाचकांनापर्यंत पोहचेल हा मला आत्मविश्वास आहे.असे प्रतिपादन करुन साप्ताहिक आपले ज्ञानपंख” वृत्तपत्राच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी “साप्ताहिक “आपले ज्ञानपंख वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ एन सुरडकर, कार्यकारी संपादक विजय बन्सी पगारे, उपसंपादक प्रविण वि.तायडे, दैनिक देशोन्नतीचे सिल्लोड तालुका प्रतिनिधी तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका सचिव संजय कुलकर्णी, दैनिक मराठवाडा साथीचे तालुका प्रतिनिधी प्रा गजानन जाधव, दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी गजानन मरकड आदी सह सर्व पत्रकार उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद
Skip to content