अजिंठा बुद्ध लेणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम धम्माचलच्या वतीने दिनांक १९नोव्हेंबर वार शुक्रवार २०२१ रोजी १६ व्या अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून नियोजित कार्यक्रमाचे ठिकाण धम्माचल अजिंठा बुद्ध लेणी फर्दापुर हे असून ही जगप्रसिद्ध असलेली अजिंठा बुद्ध लेणी सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये फर्दापुर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.तेथे असलेला धम्माचलचा परिसर हा एकूण ७४ एकरचा असून तेथे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बनवण्यासाठी राजस्थान राज्यांमधून दगड आणण्यात आला.त्या दगडामधून दोन कारागिराने टप्प्याटप्प्याने त्या दगडाचे काम करून ३२ फूट उंच अशी भव्य दिव्य ध्यानस्थ आसनात असलेली तथागत गौतम बुद्धांची मुर्ती सन २०१३ मध्ये प्रतिष्ठापित केली.
भविष्यामध्ये धम्माचलच्या ७४ एकर जमीन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम यांच्या आराखड्यानुसार नालंदा तक्षशिला या सारखे मोठ मोठे विद्यापीठ होणार आहे. त्या ठिकाणी होणा-या विदयापीठात दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकेल एवढ्या समतेचे विद्यापीठ होणार आहे. तथागत गौतम बुद्धांची ३२ फूट भव्य दिव्य मूर्ती जी प्रतिष्ठापित केली आहे ती मुर्ती बनवण्यासाठी आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये खर्च निधी करण्यात आलेला आहे त्यामध्ये ४०× ७० भिक्खूं निवासाचे बांधकाम करण्यात आले आहे. धम्माचलच्या परिसरामध्ये भविष्यामध्ये भरपूर प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे.हया १६ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे धम्म् ध्वजारोहन भदंत बोधी पालो महाथेरो, चौका औरंगाबाद यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भिक्खु लामा रेन्ड्रोल राष्ट्र: (अमेरिका) कार्यक्रमाचे अध्यक्ष: भिक्खु संघ महाथेरो प्रेसिडेंट महाबोधी, इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर (लेह लद्दाख राष्ट्र), कार्यक्रमाचे प्रमुख केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे, महाराष्ट्र राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (आमदार सिल्लोड सोयगाव विधानसभा), संजय बनसोडे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव मंत्रालय महाराष्ट्र राज्य आदींची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद